पाली : जमिनींचे वाढते भाव व गुंतवणूक करणाऱ्यांची घाई यामुळे जमिनीबाबत पूर्ण चौकशी न करता जमीन खरेदी होत असल्याने तालुक्यात जमिनीचा साठे करार करून गैरव्यवहार प्रकरणे घडत आहेत. गोंडाळे, ता. सुधागड येथील जमिनीचा साठे करार करून व्यवहार करण्यात आला होता. जमीन मालकाचे खरेदी करण्यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे येत असल्याने तपासाअंती आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार सुरेश कुमार यांच्या लक्षात आले. या व्यवहारात ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याने अंधेरीतील रहिवासी असलेल्या कुमार यांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.सुरेश कुमार यांची स्वत:ची ओसाका सिंथेटिक्स प्रा. लि. कंपनी आहे. त्यांना ठाणे व रायगड जिल्ह्यात जमिनी खरेदी करावयाच्या होत्या. त्याप्रमाणे गोंडाळे, ता. सुधागड येथील सर्व्हे नं. ३३७, ३४७ व २११ ची शैलेश दावडा यांच्या मालकीची सहा हेक्टर जमिनीचा व्यवहार ९२ लाखांना ठरविला होता. त्यापैकी ८८ लाख कुमार यांनी शैलेश दावडा यांना दिले होते. (वार्ताहर)>गुन्हा आर्थिक शाखेकडेतक्रारीनुसार आरोपीवर पाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा रायगड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
जमीन खरेदीत फसवणूक
By admin | Published: July 18, 2016 3:12 AM