विमा काढण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:20 PM2018-11-01T23:20:32+5:302018-11-01T23:20:49+5:30

कर्जत तालुक्यात शेकडो पालकांना गंडा

Fraud fraud | विमा काढण्याच्या बहाण्याने फसवणूक

विमा काढण्याच्या बहाण्याने फसवणूक

Next

कर्जत : तालुक्यातील माध्यमिक शाळांत स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कार्यालयात बोलावून फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. पकडले जाऊ नये म्हणून विमा कार्यालय चालविणारे दोन एजंट गायब झाले असल्याने या ठिकाणी पैसे गुंतवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शाळा संस्था यांनी खबरदारी न घेतल्याने असंख्य पालकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

सप्टेंबर महिन्यात कर्जत तालुक्यातील तीन प्रमुख शाळांत आपण एलआयसी विमा कंपनीचे गोल्डन कार्ड होल्डर एजंट असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली. ठाणे आणि चेंबूर येथे निवास करणारे दोन्ही एजंटनी कर्जत शहरात मुख्य वस्तीत कार्यालय घेतले. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवली. १० ते ३० हजारांचे रोख बक्षीस, हॉलिडे टूर आणि संगणक प्रशिक्षण अशी लालूच दाखविणाºया त्या दोन्ही विमा एजंट यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करण्यास सुरु वात करून विद्यार्थ्यांचा विमा काढायला सांगू लागले. तालुक्यात झुगरेवाडीतील एका कुटुंबाकडे विमा एजंटने विम्यासाठी तगादा लावल्याने त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनसूया पादिर यांची मदत घेतली. पादिर यांनी नेरळ पोलिसांना तक्रार करताच विमा एजंटांनी कर्जतमधून गाशा गुंडाळला.

चित्रकला तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतलेल्या नेरळ विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक मंगेश सुतक यांनी, शाळेत सर्व विद्यार्थ्यांना नोटीस काढून विमा कार्यालयात जाऊ नये, असे जाहीर केले आहे. त्याचवेळी त्यांनी सदर प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्र ार देखील दिली आहे. या सर्व प्रकारात रायगड जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या त्या दोन विमा एजंटांनी त्यांच्याकडे काम करणाºया स्थानिक ९ तरु णांना एकही दिवसाचा पगार दिला नाही. त्यांना कबूल केलेला पगार हा त्या एजंटांनी बुडविला असून त्यांचे नंबर पालकांकडे असल्याने त्यांना देखील पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.

Web Title: Fraud fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.