कर्जत तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:41 AM2018-12-12T00:41:09+5:302018-12-12T00:41:30+5:30

खोटे उतारे बनवून १२ लाखांचा गंडा; तीन जणांविरोधात गुन्हा

Fraud fraud in Karjat taluka | कर्जत तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणूक

कर्जत तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणूक

googlenewsNext

नेरळ : डोंबिवली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला कर्जत तालुक्यातील एका व्यक्तीने जमीन दाखवून त्याचे आगाऊ पैसे घेतले. त्यानंतर त्या जमिनीत गडबड असल्याचे वकिलाने सांगताच सदर व्यक्तीने पैसे परत मागितले म्हणून त्याबदल्यात त्यांना दुसरी मोठी जमीन कमी भावात मिळत असल्याचे सांगून तलाठ्यांकरवी खोटे उतारे बनवून तब्बल १३ लाख रुपयांना फसविले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फसवणूक झालेल्या व्यक्तीने तडक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे.

डोंबिवली येथे राहणारे मनोज नामदेव म्हात्रे यांचा डोंबिवलीतच सिद्धिविनायक इंटरप्राइजेस नावाने खाद्यपदार्थ विक्र ीचा व्यवसाय आहे. त्याजोडीला म्हात्रे नेरळ परिसरात शेतजमीन खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय देखील ते करतात. अशाच व्यवहारातून आसल येथे राहणाºया विजय दिलीप गायकवाड यांची आणि म्हात्रे यांची ओळख झाली. गायकवाड तालुक्यातील जमीन खरेदी-विक्रीमध्ये मध्यस्थी (दलाल) करण्याचे काम करतो. म्हात्रे यांनी गायकवाडला नेरळ परिसरात जमीन विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानंतर २०१६ मध्ये गायकवाड याने म्हात्रे यांना आसल भूतीवली येथील ६४ गुंठे जागा दाखवली व जागेचे पेपरही दिले. जागा पसंत पडल्याने १० लाख रु पयांना व्यवहार ठरला. तसेच जागेला कंपाउंडसाठी वेगळे पैसे द्यायचे असेही ठरले. सदर जागेचे टोकन रक्कम म्हणून ३ लाख ३१ हजार ६०० रु पये बँकेच्या एनईएफटीमार्फत दिले. या जागेचे म्हात्रे यांनी आपल्या वकिलांकरवी पेपर तपासले असता त्यात घोळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जागा घेऊ नका असा सल्ला वकिलांनी दिला. म्हात्रे यांनी गायकवाडला भेटून, ती जागा नको, पैसे मला परत देण्यास सांगितले. मात्र गायकवाडने डिसेंबर २०१६ मध्ये मौजे मानकीवली ता. कर्जत येथील स्वत:च्या नावावर असलेली दोन एकर शेती देतो, असे म्हात्रेंना सांगितले. सर्वे नं. ८/२/अ/१ या सातबारा उताºयावर तलाठी गोपाळ वाक यांचा सही शिक्का असल्याने त्याबाबत सत्यता पटल्याने त्या जागेचा देखील १० लाख रु पयात व्यवहार ठरला. मात्र प्रत्यक्ष खरेदीखत करायला दुय्यम निबंधक कार्यालयात विजय गायकवाड हजर झालाच नाही. त्यामुळे शंका निर्माण होऊन म्हात्रे यांनी तलाठी सजा वारे गाठत विजय गायकवाड यांच्या नावावर असलेल्या सर्वे नं. ८/२/अ/१ हा सातबारा लेखी अर्ज करून मागवून घेतला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड पैसेही परत देत नसल्याने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार केली.

खोटा सातबारा
कर्जत तालुक्यात जमीन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून आता चक्क लोकसेवक असलेले तलाठीच खोटे सातबारा उतारे बनवून द्यायला लागल्याची घटना समोर आल्याने सबंध जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे जमीन खरेदी - विक्री करताना सावधगिरी बागळण्याच्या सूचना देण्यात येत आहे.

Web Title: Fraud fraud in Karjat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.