अलिबाग : बनावट कागदपत्रे तयार करुन जमीनीचे बनावट जमीन मालक उभे करुन जमिनीची विक्री केल्याचा प्रकार माणगाव तालुक्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हो दाखल करण्यात आले आहेत.खरीददारांची बनावट कागदपत्रांव्दारे जमिनीची विक्री करुन लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्या घटना माणगाव तालुक्यात सातत्याने घडत आहेत. गुरुवारी अशाच प्रकारचे दोन गुन्ह्यात नवीमुंबई येथील दोघा जमीन खरेदीदारांची तब्बल २० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत राहाणाºया सहा जणांनी आपसांत संगनमत करून १८ एप्रिल २०१६ ते १६ मे २०१६ या कालावधीत बनावट व्यक्ती मालक म्हणून उभी करून, त्याच्या नावे जमिनीचे उतारे प्राप्त तयार करु न घेतले. एकाने या संबंधीत जमिनीचे सर्च रिपोर्ट देवून इतर चौघांनी साक्षीदार म्हणून या कागदपत्रावर सह्या करून बनावट दस्त तयार के ले. बोगस बनावट कागदपत्रे करून नवी मुंबई येथील जमीनखेरेदीदारकडून ११ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सहा आरोपीं विरुद्ध माणगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसºया गुन्ह्याततील आरोपी देखील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहाणे आहेत. यातही सहा जणांनी आपसांत संगनमत करून १५ एप्रिल २०१६ ते ३० मे २०१६ या कालावधीत नवी मुंबई मधील जमीन खरेदीदारांबरोबर आमडोशी गाव नमुना सातबारा या जमिन मिळकतीचे खोटे खरेदी दस्त तयार करुन खरेदिदारांची ९ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोसई ई.आर.सायगावकर हे करीत आहेत. अशा प्रकारे जमीन खरेदी करणाºयांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बनावट कागदपत्राद्वारे माणगावात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:42 AM