सरकारी रुग्णालयात फ्री तर खासगीत 250 रुपयांत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:24 AM2021-03-01T00:24:46+5:302021-03-01T00:24:58+5:30

प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू; सर्वसामान्यांना घेता येणार कोरोनाची लस 

Free in government hospitals and Rs. 250 in private | सरकारी रुग्णालयात फ्री तर खासगीत 250 रुपयांत लस

सरकारी रुग्णालयात फ्री तर खासगीत 250 रुपयांत लस

Next

- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कोरोनाची लस सर्वप्रथम डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पालिका क्षेत्रात लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, सर्वसामान्यांनाही ही लस सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. याकरिता पालिकेच्या माध्यमातून पूर्वतयारी सुरू आहे. लवकरच याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यावर अडीचशे रुपयात ही लस घेता येणार आहे. ‘आयुष्यमान भारत’शी संलग्न असलेले हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाणार आहे.


पालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात ४,९६८ तर सरकारी क्षेत्रातील २६७ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी आपले नाव नोंदविले होते. पहिल्या टप्प्यात ७० टक्के नोंदणी केलेल्या या घटकांनी लसीकरण केले. मात्र, बहुतांशी जणांनी आद्यपही लसीकरण केले नसले, तरी सर्वसामान्यांना ही लस घेता येणार आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. 


आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे, दुसरा गट फ्रंटलाइन वर्कर्स यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरा गट ५० वर्षांवरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत, अशा ५० वर्षांखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे, तर लस घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काउन्सलिंग करण्यात येणार 

 येथे मिळणार कोरोना लस 
nश्री सत्यसाई संजीवनी सेंटर ऑफ चाईल्ड हार्ट केअर, खारघर
nडॉक्टर प्रवर्धन स्मृती रुग्णालय
nपनवेल हॉस्पिटल, उरण नाका 
nउन्नती हॉस्पिटल, पनवेल
nलाईफ लाईन हॉस्पिटल
nबिरमोळे हॉस्पिटल
nश्री साई मल्टिस्पेशालिस्ट 
nआशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पनवेल
nश्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, कळंबोली 
nअलिबाग डायलेसीस सेंटर 
nलायन्स हेल्थ फाउंडेशन 

नोंदणी कशी कराल?
लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी फोटो असणारे ओळखपत्रं असणे आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना, इलेक्ट्रॉनिक केवायसीसाठी ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागेल. यासाठी १२ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, पासबुक, पेन्शनची कागदपत्रे.

कोणाला मिळणार लस?
६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येईल, तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल.

Web Title: Free in government hospitals and Rs. 250 in private

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.