शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सरकारी रुग्णालयात फ्री तर खासगीत 250 रुपयांत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:24 AM

प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू; सर्वसामान्यांना घेता येणार कोरोनाची लस 

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कोरोनाची लस सर्वप्रथम डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पालिका क्षेत्रात लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, सर्वसामान्यांनाही ही लस सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. याकरिता पालिकेच्या माध्यमातून पूर्वतयारी सुरू आहे. लवकरच याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यावर अडीचशे रुपयात ही लस घेता येणार आहे. ‘आयुष्यमान भारत’शी संलग्न असलेले हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाणार आहे.

पालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयात ४,९६८ तर सरकारी क्षेत्रातील २६७ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी आपले नाव नोंदविले होते. पहिल्या टप्प्यात ७० टक्के नोंदणी केलेल्या या घटकांनी लसीकरण केले. मात्र, बहुतांशी जणांनी आद्यपही लसीकरण केले नसले, तरी सर्वसामान्यांना ही लस घेता येणार आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे, दुसरा गट फ्रंटलाइन वर्कर्स यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरा गट ५० वर्षांवरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत, अशा ५० वर्षांखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.दुसऱ्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे, तर लस घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काउन्सलिंग करण्यात येणार 

 येथे मिळणार कोरोना लस nश्री सत्यसाई संजीवनी सेंटर ऑफ चाईल्ड हार्ट केअर, खारघरnडॉक्टर प्रवर्धन स्मृती रुग्णालयnपनवेल हॉस्पिटल, उरण नाका nउन्नती हॉस्पिटल, पनवेलnलाईफ लाईन हॉस्पिटलnबिरमोळे हॉस्पिटलnश्री साई मल्टिस्पेशालिस्ट nआशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पनवेलnश्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, कळंबोली nअलिबाग डायलेसीस सेंटर nलायन्स हेल्थ फाउंडेशन 

नोंदणी कशी कराल?लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी फोटो असणारे ओळखपत्रं असणे आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना, इलेक्ट्रॉनिक केवायसीसाठी ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागेल. यासाठी १२ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, पासबुक, पेन्शनची कागदपत्रे.

कोणाला मिळणार लस?६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येईल, तसेच ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस