उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 02:39 PM2023-11-13T14:39:19+5:302023-11-13T14:40:19+5:30

नवोदित कलाकारांनी रेखाटल्या विराट कोहली, श्यामची आई,साधू आदि व्यक्तिंच्या आकर्षक रांगोळ्या.

free rangoli exhibition on the occasion of diwali in uran | उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

मधुकर ठाकूर, उरण: दिवाळी सणाचे औचित्य साधून उरणमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.१२ ते १९ ऑक्टोंबर पर्यंत सलग ८ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विराट कोहली, श्यामची आई, साधू  आदिंची आकर्षक व्यक्ती चित्र रेखाटण्यात आली आहेत. रविवारपासून सुरू झालेले रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कूलमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने दुसऱ्या वर्षीही मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी हे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती कलावंत राजेश नागवेकर यांनी दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.या विनामुल्य रांगोळी प्रदर्शनात नंदकुमार साळवी, सिद्धार्थ नागवेकर, संतोष डांगर, नवनीत पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर,  स्वप्नाली मंचेकर आदी कलाकारांनी १३ आकर्षक  रांगोळ्या रेखाटल्या आहेत.

यामध्ये सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली, श्यामची आई, साधू आदिवासी मुलगी, साधू, लहान मुलगी, वाघाचे पिल्लू ,पक्षी, गणपती, राधाकृष्ण आदी व्यक्ती चित्र, लॅण्डस्केप आदी विविध प्रकारच्या चित्रांचा या रांगोळी प्रदर्शनात समावेश आहे. यामधे विशेष म्हणजे ७८ वर्षीय सेवा निवृत्त कलाशिक्षक नंदकुमार साळवी यांनी ९ फुट बाय ६ फुट आकाराचा गालीचा आणि थ्री डी रांगोळी प्रदर्शनातील आकर्षण ठरली आहे.
आकर्षक रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची रविवारपासूनच मात्र गर्दी वाढत चालली आहे.

Web Title: free rangoli exhibition on the occasion of diwali in uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण