मधुकर ठाकूर
उरण: दिवाळी सणाचे औचित्य साधून उरणमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.२४ ते ३० ऑक्टोंबर पर्यंत सलग सात दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मिस्टर बीन आदिंची व्यक्ती चित्र रेखाटण्यात आली आहेत.सोमवारपासुन शुभारंभ झालेले रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.
उरण शहरातील एनआय हायस्कूलमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी हे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती कलावंत राजेश नागवेकर यांनी दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.या विनामुल्य रांगोळी प्रदर्शनात नंदकुमार साळवी, सिद्धार्थ नागवेकर, संतोष डांगर, नवनीत पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, निलेश मेस्त्री, किर्तीराज म्हात्रे, स्वप्नाली मणचेकर आदी कलाकारांनी १८ आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या आहेत.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,साईबाबा,लता मंगेशकर,अमिताभ बच्चन,डॉ. हेगडेवार, मिस्टर बीन,आदिवासी मुलगी, वृद्ध महिला, साधू, लहान मुलगा आदी व्यक्तींचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"