खोपोलीत होणार नि:शुल्क रजिस्टर विवाह; गरजू व दुर्बल घटकांसाठी फायदेशीर ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:57 PM2021-03-23T23:57:35+5:302021-03-23T23:57:48+5:30

सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम, सहज सेवा फाउंडेशन ही समाजासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी आपले कर्तव्य मानून सेवा करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे

Free register marriage to be held in Khopoli; It will be beneficial for the needy and the weak | खोपोलीत होणार नि:शुल्क रजिस्टर विवाह; गरजू व दुर्बल घटकांसाठी फायदेशीर ठरणार

खोपोलीत होणार नि:शुल्क रजिस्टर विवाह; गरजू व दुर्बल घटकांसाठी फायदेशीर ठरणार

Next

खोपोली : रायगड जिल्ह्यातील गरजू व दुर्बल घटकांसाठी सहज सेवा फाउंडेशनच्यावतीने रजिस्टर पद्धतीने नि:शुल्क विवाह करून दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते व खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला.

सहज सेवा फाउंडेशन ही समाजासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी आपले कर्तव्य मानून सेवा करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. अनेक कुटुंबातील पुरुष व महिला काबाडकष्ट करून मुलांना शिकवितात. यात बरेच पैसे खर्च होतात. त्यामुळे अपत्यांचे विवाह करताना अनेकवेळा कर्ज काढून विवाह केले जातात. म्हणून सहज विवाह संस्था या मान्यताप्राप्त विवाह संस्थेच्या माध्यमातून सहज सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने समाजातील दुर्बल घटकांच्या अपत्यांचे विवाह (दोन्ही परिवाराच्या संमतीने) रजिस्टर पद्धतीने नि:शुल्क करून दिले जाणार आहेत. 

‌यावेळी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्ष इशिका शेलार, खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी. निरंजन, बंटी कांबळे, सहजसेवा रोहा तालुकाप्रमुख सचिन साळुंखे उपस्थित होते. सहज विवाह संस्थेच्या माध्यमातून सहज सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने दुर्बल घटकांच्या अपत्यांचे विवाह रजिस्टर पद्धतीने नि:शुल्क करून दिले जाणार आहेत
 

Web Title: Free register marriage to be held in Khopoli; It will be beneficial for the needy and the weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.