अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क
By Admin | Published: November 27, 2015 02:12 AM2015-11-27T02:12:29+5:302015-11-27T02:12:29+5:30
आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे.
अलिबाग : आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. व्यक्ती ही सर्वात मोठी असते. एक व्यक्ती सर्व विश्व बदलू शकते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, त्यामुळे घटना वाचाल तरच घटनेचे महत्त्व समजेल, असे मत मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांनी व्यक्त
केले.
वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाच्या वतीने संविधान दिन सोहळ््याचे आयोजन गुरु वारी करण्यात आले होते. त्यावेळी संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे बोलत होते. संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे यांनी धर्मनिरपेक्षता, समता, समाजरचना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी मुद्द्यांचे विश्लेषण केले. ते म्हणाले, जी घटना तयार करण्यात आली त्यासाठी सर्व प्रदेशाचा विचार करण्यात आला होता. प्रत्येकाला आपला जाती, धर्म महत्त्वाचा वाटत आहे. समता ही जबरदस्तीने तयार करता येत नाही, तर ती मनात असली पाहिजे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोण्या गटासाठी नसून प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्यामुळे त्यातून ती व्यक्ती आमूलाग्र बदल घडवून आणू शकते,असा विश्वास डॉ.रानडे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. अतुल साळुंके, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक, प्रा. डॉ. प्रगती पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा. सानिका बाम आदी मान्यवर, विविध विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएसचे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या प्रसंगी संविधानाचे वाचनही करण्यात आले. डॉ. संजय रानडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. (विशेष प्रतिनिधी)