अलिबाग : ‘रुद्र ’ किंवा ‘रुद्राध्याय’ या नावाने ओळखल्या जाणारा मंत्र समूह ‘कृष्णयजुर्वेदातील’ अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो. रुद्राचा जप अथवा पठण महापातकांचा नाश करून विश्वकल्याण साध्य करण्यासाठी एकमेव प्रभावी अस्त्र मानले जाते. यजुर्वेदाचा सारभूत भाग म्हणजे रुद्राध्याय आहे. सामान्य माणसांनी रुद्राचा जप तर करावाच पण संन्याशांनीही तो अवश्य करावा, असे शास्त्रकार सांगतात. परंतु ‘रुद्रा’चा जप वा पठण केवळ पुरुषांनी करावे ते महिलांनी करू नये, अशी एक पुरुषी मर्यादा घातली गेली होती. परंतु आता ‘रुद्र्र’पठणाचे स्वातंत्र्य महिलांनी देखील घेतले असून, शनिवारी श्रावण प्रतिपदा आणि भारतीय स्वातंत्र्यदिन असे आगळे औचित्य साधून येथून जवळच असलेल्या बामणगाव-वढाव येथील उमा महेश्वर देशमुख यांच्या निवासस्थानी अलिबाग परिसरातील तब्बल ३३ महिलांनी सामूहिक लघुरुद्र पठणाचा मंत्रघोष करून, भारतीय स्वातंत्र्यदिनी रुद्र पठणाची स्त्रीमुक्ती सिद्ध केली आहे.छबाराव जोशी गुरुजींचा पुढाकाररुद्र पठणाचा अधिकार हा महिलांनाही आहे. त्यांचा हा पुण्यकर्माचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी भूमिका स्वीकारुन अलिबागेत गेल्या दहा वर्षांपूर्वी छबाराव जोशी गुरुजींनी पुढाकार घेतला. त्यावेळी त्यांच्या भूमिकेस काहींनी विरोध केला होता.‘राष्ट्रभक्ती’ अन् ‘देवभक्ती’ची अनोखी प्रचितीअलिबागेतील महिलांचा पहिला रुद्र पठणाचा जयघोष डॉ. हेमा देशमुख यांच्याकडे झाला. शनिवारी उमा महेश्वर देशमुख या शिवलिंगास जलाभिषेक करीत असताना माधुरी सुरेंद्र जोशी, अॅड. स्वाती संजय कुलकर्णी, संस्कृतच्या प्राध्यापिका संपदा देशपांडे, स्मिता महेश गोडबोले आदी ३३ महिलांनी अस्खलित संस्कृतातील १२१ रुद्र मंत्र आवर्तने सामूहिकरीत्या करुन लघुरुद्र साकारताना वातावरण भक्तिमय झाले होते.‘नमक व चमक’चा बनतो रुद्राध्याय‘रुद्र ’ किंवा रुद्राध्यायाचे ‘नमक’ आणि ‘चमक’ असे दोन भाग आहेत. प्रत्येक विभागात ‘अकरा’ अनुवाक दहा ते पंधराच्या दरम्यान मंत्र आहेत. ‘नमक ’ विभागातील काही मंत्राच्या शेवटी ‘नम:’ शब्द आहे. ‘चमक’ विभागात काहीवेळा ‘चमे’ हा शब्द सुरुवातीला येतो.
स्वातंत्र्यदिनी रुद्र पठणाची ‘स्त्री’मुक्ती
By admin | Published: August 15, 2015 10:53 PM