ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 05:47 PM2023-09-09T17:47:43+5:302023-09-09T17:47:54+5:30

ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी पहाटे गळती लागली.

Frequent oil spills at ONGC projects Farmers, fishermen angry Cleaning work stopped | ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले 

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या तेल गळती आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षा, आरोग्याबरोबर स्थानिक मासेमारी, शेतीही धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ओएनजीसीने सुरू केलेले किनाऱ्यावर पसरलेले ऑईल जमा करण्याचे काम रात्री उशिराने बंद पाडले. येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी पहाटे गळती लागली.

नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पीरवाडी बीचवरील समुद्राच्या पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या सागरी प्रदुषणामुळे परिसरातील भातशेती व स्थानिक मासेमारीही धोक्यात आली आहे. ओएनजीसी व्यवस्थापनाकडून शुक्रवार पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहे.मात्र वारंवार घडणाऱ्या तेल गळती आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षा, आरोग्याबरोबर स्थानिक मासेमारी, शेतीही धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ओएनजीसीने सुरू केलेले किनाऱ्यावर पसरलेले ऑईल जमा करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिराने बंद पाडले.

यावेळी तेल गळतीमुळे मच्छीमार, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही संतप्त नागरिकांनी केली. ओएनजीसीने किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे  गोळा करण्यात येणारे काम बंद केल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि तहसीलदारांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली.त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी ओएनजीसीकडे पाठविण्यात येतील. आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासन उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या मध्यस्थीने मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतरच किनारा साफसफाईचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कदम यांनी दिली.

...तय्यार है हम  
तहसीलदारांशी पुढील आठवड्यात आर्थिक नुकसान भरपाईच्या प्रश्नावर बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर शेतकरी, स्थानिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती ओएनजीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी दिली. तसेच प्रकल्पातील तेलगळती नियंत्रणात आली आहे. किनाऱ्यावरील वाहून गेलेले तेलही जमा करण्यात यश आले असल्याचेही बोस यांनी सांगितले.

दरम्यान उरण ओएनजीसीच्या तेल गळतीची चौकशी करून बाधित शेतकरी व मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासाठी उरण तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. याप्रसंगी संघटनेचे मधुसूदन म्हात्रे, भुषण पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Frequent oil spills at ONGC projects Farmers, fishermen angry Cleaning work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.