उरण नगरपरिषदेविरोधात मोर्चा

By admin | Published: August 10, 2016 03:17 AM2016-08-10T03:17:34+5:302016-08-10T03:17:34+5:30

उरण परिवर्तन महाआघाडीच्या उरण परिवर्तन संघर्ष समितीच्या वतीने शहरातील विविध समस्यांच्या विरोधात उरण नगर परिषदेवरच मोर्चा काढण्यात आला

Front against Uran Nagarparishad | उरण नगरपरिषदेविरोधात मोर्चा

उरण नगरपरिषदेविरोधात मोर्चा

Next

उरण : उरण परिवर्तन महाआघाडीच्या उरण परिवर्तन संघर्ष समितीच्या वतीने शहरातील विविध समस्यांच्या विरोधात उरण नगर परिषदेवरच मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (९) काढण्यात आलेल्या मोर्चात महाआघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आदि घटक पदाधिकाऱ्यांसह सुमारे १५० नागरिक सहभागी झाले होते.
उनपवर मागील १५ वर्षांपासून सेना- भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्ताकाळात उरण शहरवासीयांच्या समस्या दूर करण्याऐवजी वाढविण्याचे काम केल्याचा आरोप करीत महाआघाडीने मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला होता. माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मात्र विवेक पाटील पेन्शनर पार्कपर्यंत वेळीच पोहोचलेच नाहीत. त्यामुळे ताटकळत राहिलेल्या मोर्चेकऱ्यांनी पेन्शनर पार्कपासून मोर्चाला प्रारंभ केला. शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात उरण परिवर्तन महाआघाडीचे निमंत्रक महेंद्र कांबळे, काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी आदिंसह महाआघाडीतील घटक पक्षांचे अन्य पदाधिकारी, १५० नागरिक सहभागी झाले होते. महाआघाडीने सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप करीत शहरातील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मोर्चात उशिराने सहभागी झालेले माजी आ. विवेक पाटील आणि महाआघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहरवासीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत निवेदनही देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Front against Uran Nagarparishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.