शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झालेल्यांचे दारिद्र्य कायमचे संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:23 AM

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडवर रविवारी छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेक दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, पीएनपी शिक्षण संस्थेच्या संचालक चित्रलेखा पाटील, सौरभ खेडेकर, सुधीर भोसले, सुदर्शन तारक आदि मान्यवर या कार्यक्र माला उपस्थित होते. कार्यक्र माचे अध्यक्षस्थान अर्जुन तणपुरे यांनी भूषविले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खºया अर्थाने रयतेचे राजे होते. ही भूमी परशुरामाची नाही तर शिवप्रभूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तांत्रिक अथवा वैदिकतेचे समर्थन केले नाही. बुवाबाजी, रामरहिमसारखी प्रकरणे यावर मिटकरी यांनी कडक शब्दांमध्ये हल्ला चढविला.आज शिवाजी महाराज असते तर रामरहिमचे हातपाय तोडून त्याचा गडावरून कडेलोट केला असता.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये, लहान वयामध्ये हिरकणी पुरस्कार मिळाल्याने भविष्यात आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. राजकीय वारसा आणि वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. माता ही राजमातांसारखी आणि पुत्र हा शिवाजीराजांसारखा असावा. त्याचप्रमाणे राजमातांच्या विचारांचेही अनुकरण करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हिरकणी पुरस्काराने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात रायगडमधील जनता आणि महिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात अर्जुन तनपुरे यांनी छ. शिवाजी महाराज हे क्र ांतिकारी राजे होते असे सांगत, त्यांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्याची स्थापना केल्याचे सांगितले.पीएनपीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी समाजामध्ये आजही पूर्ण समानता आलेली नसल्याची खंत व्यक्त केली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आज महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात पुढे आल्या आहेत असे त्या म्हणाल्या. महिलांचे उच्चशिक्षण आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी आपल्या भाषणात शाक्त राज्याभिषेक सोहळ्याचे वर्तमान स्थितीतील महत्व विषद केले. सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आजचा हा कार्यक्र म भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर करण्याचा मनोदय व्यक्त के ला.प्रारंभी मेघडंबरी येथे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांच्यासह इतर समविचारी कक्ष, संघटना यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते.