उरण तहसीलवर शेतकºयांचा मोर्चा ; गैरव्यवहार करणाºयांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:22 AM2018-02-15T03:22:14+5:302018-02-15T03:22:24+5:30
करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारामध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अन्य मागण्यांबाबत बुधवारी (१४) येथील शेतकºयांनी उरण कार्यालयावरच मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
उरण : करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारामध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अन्य मागण्यांबाबत बुधवारी (१४) येथील शेतकºयांनी उरण कार्यालयावरच मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकºयांसह शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत टर्मिनल अॅण्ड प्रा. लि. कंपनीने बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. करंजा खाडीत शेकडो हेक्टरवर उभारण्यात येत असलेल्या बंदरासाठी येथील ९० शेतकºयांच्या २०० एकर जमिनी संपादित केल्या आहेत. २००५-२००६ साली जमिनी संपादित करताना पाच वर्षांत प्रकल्प उभारण्याची आणि प्रकल्पग्रस्तांना घरटी तीन कायमस्वरूपी नोकºया देण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, १४ वर्षांत ना धड बंदराची उभारणी झाली, ना धड प्रकल्पग्रस्तांना नोकºया मिळाल्या. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. उलट जमिनी संपादन करताना शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्याची रक्कम देताना अज्ञानाचा फायदा घेत पॉवर आॅफ अॅटर्नी करून घेतली होती. शेतकºयांच्या या पॉवर आॅफ अॅटर्नीचा गैरफायदा घेत करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीने महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड, सिडकोकडून बंदर उभारणीच्या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविल्या असल्याचा आरोप चाणजे शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. चाणजे सर्व्हे नं. ४२२/४२३मध्ये बंदराच्या उभारणीसाठी समुद्रखाडीत भरावाचे काम केले होते. समुद्रखाडीतील भरावामुळे मात्र गावागावांत समुद्राचे पाणी शिरू लागले होते. समुद्राचे पाणी शेतीत आणि गावात शिरू नये, यासाठी त्याला अटकाव करण्यासाठी कंपनीने साकव उभारला होता. तसेच या मार्गावरून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी हाइट गेटही उभारण्यात आले होते. मात्र, कंपनीने संबंधित शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून आणि शेतकºयांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, हाइट गेट काढून टाकले आहेत. त्याचे परिणाम होऊन साकवही कमजोर झाला आहे. त्यावरून आता कंपनीचीच अवजड वाहन ये-जा करीत असल्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा आरोप आहे.
करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.
शेतकºयांच्या मागण्या
शेतकºयांच्या जमीन सुरक्षिततेसाठी असलेल्या साकवाचाच गैरवापर थांबवा, बेकायदेशीररीत्या काढण्यात आलेले हाइट गेट पूर्ववत सुरू करा, बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारांमध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा टर्मिनल अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कंत्राटी कामे आणि नोकर भरतीमध्ये बाधित शेतकºयांना प्राधान्य देण्यात यावे आदी प्रमुख मागण्या आहेत.