शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

महाव्यवस्थापकांपुढे प्रवाशांनी मांडले गाऱ्हाणे

By admin | Published: February 13, 2017 5:11 AM

रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.

कर्जत : रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित कर्जतकरांनी त्यांना मागण्यांची निवेदने दिली. यावेळी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन शक्य त्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. रविवारी दुपारी २च्या सुमारास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे कर्जतकर प्रवाशांना समजल्याने त्यांनी दुपारी १.३० वाजताच कर्जत रेल्वे स्थानकात गर्दी केली. मात्र, तब्बल अडीच तास उशिरा महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल व त्यांची पूर्ण टीम विशेष गाडीने कर्जत रेल्वे स्थानकात उतरली. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश खानविलकर, माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर,कार्याध्यक्ष केतन शहा, उपाध्यक्ष नगरसेवक मुकेश पाटील, पंकज ओसवाल, गोपीनाथ ओसवाल आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शर्मा यांच्या हस्ते चालक दालनाचे व एलईडी लाइटचे उद्घाटन केले. त्यानंतर कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन शर्मा यांना दिले. निवेदनामध्ये पुणे- एर्नाकुलम, पुणे-नांदेड, बिदर-कुर्ला, नांदेड-कुर्ला, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नागरकोयल-मुंबई, हुबळी-कुर्ला या गाड्या कर्जत स्थानकावर थांबत नाहीत, त्यांना कर्जतला थांबा द्यावा. तसेच कर्जतहून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला अधिकृत थांबा द्यावा. चार वर्षांपासून रखडलेले पुणे एंडकडील मुंबई एंडकडे उतरण्याच्या जिन्याचे काम करावे. कर्जत-लोणावळा व कर्जत-पनवेल शटलसेवा सुरू करावी. रेल्वेचे आरक्षण माहिती मिळणारे पीओईटी मशिन गेल्या पाच वर्षांपासून दुरु स्तीला दिले आहे, ते लवकर पुन्हा रेल्वे स्थानकात बसवावे. सरकता जिना करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)