शेतक-यांचा माणगावमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:33 AM2017-08-02T02:33:30+5:302017-08-02T02:33:30+5:30
रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे.
माणगाव : रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. या प्रक्रि येमध्ये भूसंपादन सक्तीने होत असून, शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत असल्याचे आरोप करत कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी माणगाव येथे आंदोलन केले. भरपावसात संघर्ष समितीने मोर्चा काढून प्रांत कार्यालयावर धडक देऊन निषेध व्यक्त केला.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरसाठी शेतकºयांकडून भूसंपादन गेली चार वर्षे सुरू आहे. दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया या प्रकल्पासाठी जो या कॉरिडोरचा भाग आहे, त्यासाठी संपादन सुरू आहे. या संपादनाविरु द्ध सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रथम संपादनातील हे क्षेत्र ६७,५०० एकर होते ते कमी करून सुमारे १५,८६५ एकरपर्यंत करण्यात आले. त्या दरम्यान, २०१३मध्येच कॉरिडोरच्या केंद्रीय महामंडळाने हे संपूर्ण क्षेत्र वगळण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाला दिला होता. तसे लेखीपत्रही महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला देण्यात आले होते; परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाचे भूसंपादन चालूच आहे. हे भूसंपादन थांबावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या वेळी शेतकरी व उल्का महाजन उपोषण करणार होत्या; परंतु प्रशासनाने १५ दिवस यासाठी मागितल्याने उपोषणकर्त्यांनी १५ दिवस उपोषण पुढे ढकलल्याचे सांगितले.