शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शेतक-यांचा माणगावमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:33 AM

रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे.

माणगाव : रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. या प्रक्रि येमध्ये भूसंपादन सक्तीने होत असून, शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत असल्याचे आरोप करत कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी माणगाव येथे आंदोलन केले. भरपावसात संघर्ष समितीने मोर्चा काढून प्रांत कार्यालयावर धडक देऊन निषेध व्यक्त केला.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरसाठी शेतकºयांकडून भूसंपादन गेली चार वर्षे सुरू आहे. दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया या प्रकल्पासाठी जो या कॉरिडोरचा भाग आहे, त्यासाठी संपादन सुरू आहे. या संपादनाविरु द्ध सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रथम संपादनातील हे क्षेत्र ६७,५०० एकर होते ते कमी करून सुमारे १५,८६५ एकरपर्यंत करण्यात आले. त्या दरम्यान, २०१३मध्येच कॉरिडोरच्या केंद्रीय महामंडळाने हे संपूर्ण क्षेत्र वगळण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाला दिला होता. तसे लेखीपत्रही महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला देण्यात आले होते; परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाचे भूसंपादन चालूच आहे. हे भूसंपादन थांबावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या वेळी शेतकरी व उल्का महाजन उपोषण करणार होत्या; परंतु प्रशासनाने १५ दिवस यासाठी मागितल्याने उपोषणकर्त्यांनी १५ दिवस उपोषण पुढे ढकलल्याचे सांगितले.