यशवंतनगर ग्रा.पं.साठी मंत्रालयावर मोर्चा
By admin | Published: July 26, 2016 03:09 AM2016-07-26T03:09:47+5:302016-07-26T03:09:47+5:30
विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा
विक्रमगड : विक्रमगड ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असून विक्रमगड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या २७७४ लोकसंख्या असणाऱ्या यशवंतनगर, टोपलेपाडा, नवपाडा, वाकडूपाडा संगमनगर अशा एकूण १० ते १२ पाडयांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून विक्रमगड नगरपंचातीमध्ये न घेता नवीन यशवंतनगर ग्रामपंचायत निर्मिती करावी याकरिता सोमवारी कृती समितीच्या वतीने विक्रमगड ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात आला. त्याला श्रमजिवीने व कुणबीसेनेने जाहीर पाठींबा दिला होता.
या मोर्चामध्ये लहान बालकासह महिला व पुरूषानी मोठया संख्येने सहाभाग होता. यशवंतनगर हे ९९ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले महसूल गाव आहे पेसा अंतर्गत या गावाचा समाविष्ट असून गेल्या १० ते १५ वर्षापासून या गावाची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी असताना अचानक विक्रमगड नगर पंचायत करण्यात आली आदिवासी गावाना विश्वासात घेतले नाही असा आरोप माजी सरपंच भालचंद्र मोरघा यांनी केला आहे. या नगरपंचायतीमुळे सवलती व लाभापासून आदिवासीना मुकावे लागणार आहे म्हणून हा विरोध असून जोपर्यंत यशवंतनगर वेगळी ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच रहाणार आहे. (वार्ताहर)
यशवंतनगर ग्रामपंचायत वेगळी होण्यासाठी अनेक आंदोलने झाली पंरतु या सरकारने व स्थानिक आमदार व पालकमंत्री यांनी जाणून बूजून लक्ष दिले नाही.
-विवेक पंडीत, माजी आमदार