मुरुड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी, ७१ लाख ८१ हजार मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:15 AM2017-09-01T01:15:47+5:302017-09-01T01:15:50+5:30

मुरुड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी डोंगरी विकास कार्यक्र मांतर्गत ७१ लाख ८१ हजार रु पयांचा भरघोस निधी प्राप्त होऊन यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ही सर्व कामे थोड्याच दिवसात सुरू होणार आहेत

Fund for development works in Murud taluka, 71 lakh 81 thousand sanctioned | मुरुड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी, ७१ लाख ८१ हजार मंजूर

मुरुड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी, ७१ लाख ८१ हजार मंजूर

Next

नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी डोंगरी विकास कार्यक्र मांतर्गत ७१ लाख ८१ हजार रु पयांचा भरघोस निधी प्राप्त होऊन यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ही सर्व कामे थोड्याच दिवसात सुरू होणार आहेत. मुरु ड तालुक्यातील विविध गावांतील २२ कामांना मंजुरी मिळाली आहे.
डोंगरी विकास कार्यक्र मांतर्गत सावली स्मशानभूमी येथे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी २ लाख ९२ हजार रु पये, खामदे भोगेश्वर मंदिर येथे रस्ता तयार करणे २ लाख ९९ हजार, शीघ्रे मोहल्लाअंतर्गत रस्ता तयार करणे २ लाख ९९ हजार, शीघ्रे येथे आदिवासी वाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे २ लाख ९९ हजार, वेळास्ते रस्ता तयार करणे ३ लाख ९९ हजार, नागशेत येथे अंतर्गत रस्ता तयार करणे २ लाख ९९ हजार, आगरदांडा येथे सामाजिक सभागृह बांधणे ५ लाख रु पये, टोकेखार येथे सामाजिक सभागृह बांधणे २ लाख ९९ हजार, नांदगाव मोहल्लाअंतर्गत रस्ता काँक्र ीटीकरण २ लाख ९९ हजार, चिकणी येथे रस्ता तयार करणे ५ लाख रु पये, सर्वे येथे सामाजिक सभागृह बांधणे २ लाख ९९ हजार, जिल्हा परिषद शाळा वावडुंगी दुरु स्त करणे २ लाख ९९ हजार रु पये अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली, अशी माहिती मनोज भगत यांनी दिली. लवकरच या कामांना सुरु वात होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, वावडुंगीचे माजी सरपंच अजित कासार यांनी दिली. अलिबाग मुरु डचे आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मिळाल्याची माहिती या वेळी भगत यांनी दिली.

Web Title: Fund for development works in Murud taluka, 71 lakh 81 thousand sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.