शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्ह्यात २०० स्वच्छतागृहांसाठी निधी देणार

By admin | Published: January 28, 2017 2:54 AM

भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी लायन्स क्लब उत्सुक असून, सरकारच्या सोबत राहून

अलिबाग : भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी लायन्स क्लब उत्सुक असून, सरकारच्या सोबत राहून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी २०० स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निधी देणार असल्याची घोषणा लायन्स क्लब इंडियाचे अध्यक्ष सुभाष भलवाल यांनी केली. लायन्स क्लब अलिबागच्या वतीने अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी लायन्स अलिबाग फेस्टिव्हल-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी रात्री सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर टीव्ही कलाकार आशा शेलार, अलिबागचे आमदार पंडित पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, पी.एन.पी.च्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, आरडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अ‍ॅड. आस्वाद पाटील, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे आदी मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब अलिबागने निश्चितपणे ग्रामीण भागातील जनतेच्या सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रामुख्याने आरोग्य शिबिरे, शैक्षणिक शिबिरे घेतली जात आहेत. स्पर्धात्मक युगात लायन्स क्लबने आपले नाव यशोशिखरावर नेले आहे. लायन्स क्लबने आपली व्याप्ती अधिक वाढवून आता युवा पिढीला लायन्स क्लबने सदस्यत्व द्यायला हवे. तसे केल्यास लायन्सचे सुरू असलेले सामाजिक उपक्र म अधिकपणे समाजात पोहचविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पी.एन.पी. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले.लायन्स क्लब अलिबागने सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी ४२ वर्षे यशस्वी पूर्ण केली आहेत. सलग ११ वर्षे लायन्स अलिबाग फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. बदलत्या काळानुसार लायन्स क्लबने आता सामाजिक उपक्र मांची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचायला हवे यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार्य करेलच, त्याचबरोबर अलिबाग न.प.च्या सोबतीने अनेक वेगळे उपक्र म राबविता येतील, असे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी सूचित केले.