गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा दुथडी भरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:28 PM2018-08-20T23:28:57+5:302018-08-20T23:29:21+5:30

एसटीचे वेळापत्रक कोलमडले; बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

Gadi, Kalundre, Patalganga filled with scum | गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा दुथडी भरून

गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा दुथडी भरून

Next

पनवेल : मागील काही दिवसांपासून थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी जिल्ह्यातील अनेक भागांत पुन्हा जोर धरला. पावसामुळे गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा नदीचे पात्र भरून वाहू लागले. त्याचबरोबर परिसरातील नालेसुद्धा मंगळवारी दुथडी भरून वाहत होते. जोरदार पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागात पाणी साचले. काही भागात तर गुडघाभर पाणी साचल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
रविवारी रात्रीपासून कोसळणाºया मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पनवेलकरांना बसला. ठिकठिकाणी पाणी साचले होते. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. काही भागातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे दिसून आले. पनवेल शहरातील सोसायटीतील लिटल अन्जल्स स्कूलकडे जाणारा रस्ता, शिवाजी पुतळ्याजवळील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, पंचरत्न हॉटेलजवळील रस्ता, मोमीन पाडा, ओएनजीसी कॉलनी, नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल आदी ठिकाणचे रस्ते जलमय झाले होते. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलजवळील रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पनवेल महापालिकेच्या शाळेभोवती देखील गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.

चौल-रेवदंडा परिसराला झोडपले
रेवदंडा : गेले दोन दिवस हलक्या सरी कोसळत असताना सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने चौल-रेवदंडा परिसराला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी सर्वच विद्यालयात विद्यार्थी संख्या घटलेली दिसली. एसटी फेºयांचे वेळापत्रक कोलमडलेले होते. अनेक नद्या, नाले दुथडी भरून पुन्हा वाहू लागले असून सखल भागात पाणी साचले. बाजारपेठेत भाजीविक्रेते, दुकाने खुली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने शुकशुकाट जाणवत होता. कार्यालयात, बँकांत कामकाज थंडावलेले दिसले. पावसाने नारळ काढणीची कामे बंद पडली आहेत. सुपारी पिकावर रोगाची भीती बागायतदारांनी व्यक्त केली.

Web Title: Gadi, Kalundre, Patalganga filled with scum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.