गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:21 AM2017-07-29T02:21:25+5:302017-07-29T02:21:31+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील

ganaesaotasavaapauuravai-saravaca-khadadae-bharanaara | गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

गणेशोत्सवापूर्वी सर्वच खड्डे भरणार

Next

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात केंद्रीय योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीय मंत्र्यांच्या या आदेशाने महामार्गावरून प्रवास करणाºयांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची खड्ड्यांतील प्रवासातून सुटका होणार आहे, गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमानी या कालावधीत मोठ्या संख्येने कोकणात येतात. पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पत्रकारांनी केली. महामार्गावरील खड्डे भरण्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरण्यात येतील, असे गीते यांनी स्पष्ट केले.
रोजगार हमी योजनेचा रायगड जिल्ह्यातील शेतकºयांंनाही फायदा व्हावा यासाठी आता शेतकºयांनी त्यांच्या शेतावर घातलेला बांध आणि कंपोस्ट खतांसाठी केलेले खड्डे ही आता रोजगार हमी योजनेच्या कक्षेत धरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकºयांसाठी ही चांगली योजना असल्याने त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गीते यांनी केले. या आढावा बैठकीच्या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आदी उपस्थित होते.

विकासकामात
चालढकल करू नका
ठेकेदारासह अधिकाºयांनी विकासकामात चालढकल केली तर, त्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा सजड दमच गीते यांनी भरला. विकासकामांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला फ्रीहॅण्ड
दिला आहे. तुमच्या कामात मी कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे कामात दिरंगाई नको आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केली आहेत त्यांची बिले अडवू नका, अन्यथा माझ्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशाराही गीते यांनी दिला.

1800
शेतकºयांना योजनेचा लाभ
1रायगड जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ८० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये १०० टक्के लावणीची कामे पूर्ण होतील. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाचा हंगाम चांगला जाणार आहे.
2सरकारने पीक विमा योजनेमध्ये
आता भाताच्या पिकालाही संरक्षित केले आहे. हेक्टरी ३९ हजार रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. यासाठी फक्त एकदाच ७५० रु पये हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून १२९ कोटी
रु पयांची विजेसंबंधीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आता
विजेच्या कोणत्याच तक्र ारी
राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


कैद्यांकरिता
निधी मंजूर
अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांना रु ग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे कारागृहासाठी एक रु ग्णवाहिका मिळावी, अशी मागणी जिल्हा कारागृह अधीक्षकांनी गीते यांच्याकडे अर्जाद्वारे केली. त्याला तत्काळ मंजुरी देत त्यांनी नऊ लाख २५ हजार ७४५ रु पयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे कारागृहातील कैद्यांसाठी आता रुग्णवाहिका उपलब्ध होण्यातील अडथळा दूर झाला आहे.
‘रोहयो’साठी निधी
रायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आहे; परंतु जिल्ह्यात जॉबकार्ड असणाºयांची संख्या खूपच कमी असल्याची माहिती
कें द्रीय मंत्रीअनंत गीते यांनी दिली.

Web Title: ganaesaotasavaapauuravai-saravaca-khadadae-bharanaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.