लोकमत न्यूज नेटवर्करायगड ः विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य पासून प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे हि प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. रायगड किल्ल्यावर येणे हे मी तीर्थश्रेत्र मानताे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी महाड किल्ले रायगडावर केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज दुपारी सव्वा बारा वाजता रोपवे ने रायगड किल्ल्यावर आले. त्यांच्या पत्नी सविता काेविंदही उपस्थित हाेत्या. त्यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती, रायगडचे खासदरा सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा याेगिता पारधी, स्थानिक आमदार भरत गाेगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचेही प्रकाशन केले.छतपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चाललाे तर आपण स्वराजाची प्रति कल्पना साकारु शकू, असा विश्र्वास राष्ट्रपती यांनी व्यक्त केला. शिवाजी महाराजांना दुरदृष्टी हाेती. त्यांनी त्या कालावाधीत नाैदलाची निर्मिती केली हाेती. हे यावरुनच सिध्द हाेते, असेही राष्ट्रपती यांनी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडावर आल्यानंतर प्रथम होळीच्या माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. राजसदरेवर राष्ट्रपती कोविंद यांनी अभिभाषण केले. त्यानंतर समाधी स्थळावर आपल्या कुटूंबसह जाऊन ते नतमस्तक झाले. त्यांनी रायगड प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती यांना दांडपट्टा, भवानी तलवार, अज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होनची (नाणे) प्रतीकृती भेट दिली.