कर्जत : कर्जत पोलीस ठाणे व टाटा पॉवर भिवपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी वाहतुकीचे नियम तोडणाºया चालकाला गुलाबपुष्प व वाहतुकीसंदर्भातील पत्रक देऊन नियम पाळण्याबाबत विनंती करण्यात आली. मात्र यापुढे वाहतुकीचे नियम न पाळणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांखालील मुले-मुली गाडी चालवताना आढळल्यास पोलीस त्यांच्या पालकांवर कारवाई करणार आहेत, अशी माहिती कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिली.कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहायक फौजदार बी. एस. मुसळे, सुभाष राजमाने, रमेश दोरताले, सागर नायगुडे, बाबासाहेब जाधव, शैलेश कदम, दीपा खडे, बिंदिया वसावे तसेच टाटा पॉवर भिवपुरी कंपनीचे मुख्य अधिकारी धीरज कामत, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत केजळे आदींनी कर्जत शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या चार फाटा येथे हे अभियान राबविले. हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवीत असल्यास, परवाना नसलेला वाहन चालक, १८ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास, वाहन चालवत असताना मोबाइल फोनचा वापर करताना आढळल्यास, मद्य पिऊन गाडी चालवत असताना आढळल्यास अशा चालकाला इशारा म्हणून गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली व त्यांना नियम पाळण्याबाबाबतचे पत्र दिले.यापुढे वाहतूक सुरक्षा अभियान कडकपणे राबविले जाणार आहे. नियमांचे पालन न करणाºया चालकांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांखालील मुले जर गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानवडे यांनी दिली.
कर्जत शहरात वाहतूक सुरक्षा अभियानात गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:45 AM