शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये रंगकामाला वेग

By admin | Published: July 28, 2016 3:02 AM

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आबालवृध्दांचा लाडका बाप्पा ५ सप्टेंबर रोजी घराघरात अवतरणार आहे. बाप्पांच्या प्रतीक्षेची आस जशी सर्वांनाच आहे. त्या बाप्पांच्या मूर्तीच्या

- दत्ता म्हात्रे, पेण

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आबालवृध्दांचा लाडका बाप्पा ५ सप्टेंबर रोजी घराघरात अवतरणार आहे. बाप्पांच्या प्रतीक्षेची आस जशी सर्वांनाच आहे. त्या बाप्पांच्या मूर्तीच्या रंगकामांना सध्या पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये वेग घेतला असून बाप्पांचे निर्माते तथा मूर्तिकार आपल्या कार्यशाळांच्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र रंगकामावर भर देत आहेत. पेणच्या कलाग्राम हमरापूर-जोहे-कळवे या नगरीत सध्या कच्च्या मूर्तींची मागणी प्रचंड वाढली असून या ग्रामीण परिसरात १० लाख छोट्या-मोठ्या तर शहरात ८ लाख मिळून १८ लाख गणेशमूर्तींचे निर्माण पेणच्या कार्यशाळांमधून झाले असून १० हजार कामगारांचा राबता आॅगस्ट अखेरपर्यंत कायम राहणार आहे. मुंबईत जागेअभावी गणेशमूर्तींची विक्री व गाळ्याचे भाडे मूर्तिकारांना डोईजड ठरते. येत्या ४० दिवसात हा व्यवसाय पूर्ण होणार असल्याने त्याची मेगा तयारी पेणच्या सर्वच कार्यशाळांमधून सुरू आहे. शाडूच्या मूर्ती व प्लॅस्टर आॅफ पॅरिस अशा दोन्ही प्रकारातील मूर्ती पेणच्या कार्यशाळांमध्ये तयार आहेत. यावर्षीचा महागाईचा निर्देशांक चढता असल्याने त्या परिणाम स्वरूप बाप्पांच्या मूर्तींमध्ये तब्बल १५ टक्के वाढ होणार आहे. यामध्ये शाडूची माती २० टक्क्यांनी वाढली, २५० ची गोण ३५० रुपये झाली. १०० रुपये प्रति गोण वाढल्याने ३५ किलोच्या गोणीत एक फुटाचे चार बाप्पा तयार होतात. काथ्याचा भाव ९०० रुपयांवरून १२०० रुपये, मजुरीचे दरही १५ टक्के वाढले. रंग, माती, प्लॅस्टर, मजुरी व दळणवळण, वीजबिल यासर्व बाबी जमेस धरून यावर्षीची महागाई पाहता बाप्पांच्या प्रतिमूर्तीमध्ये १५ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे कार्यशाळांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.