गणेश जयंती... पाली गावचा बल्लाळेश्वर; भाविकाकडून मंदिराला द्राक्षाची सजावट
By राजेश भोस्तेकर | Published: February 13, 2024 09:40 AM2024-02-13T09:40:43+5:302024-02-13T09:42:13+5:30
नाशिक येथील भाविकाने केली सजावट
अलिबाग : माघी गणेशोत्सव निमित्त पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराला द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. बल्लाळेश्वर मूर्ती गर्भगृहात, प्रवेश द्वाराला ही द्राक्षाची सुंदर सजावट नाशिक मधील एका भाविकांनी केली आहे. सभामंडप येथेही फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर हे द्राक्ष आणि फुलांच्या सजावटीने खुलले आहे. माघी गणेशोत्सव निमित्त पाली येथे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
मंगळवारी १३ फेब्रुवारी जिल्ह्यात माघी गणेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गावागावात ठिकठिकाणी असलेल्या गणेश मंदिरात तसेच महत्वाच्या मंदिरात माघी गणेशोत्सव निमित्त सजावट करण्यात आली आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे गणरायाच्या भक्तिरसात न्हाऊन गेला आहे.
अष्टविनायक पैकी एक असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरातही माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नाशिक येथील एका गणेश भक्ताने पाचशे किलो द्राक्षाची सजावट केली आहे. त्यामुळे मंदिरातून सौंदर्य खुलले आहे. मध्यरात्री यथासांग पूजा अर्चना केल्यानंतर माघी गणेशोत्सव निमित्त भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. पहाटे पासूनच भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केली आहे. भाविकांना दर्शन घेण्यास मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य सुविधा केली आहे. मंदिराच्या बाहेर राम मंदिराची सुबक रांगोळी ही काढण्यात आलेली आहे. त्यामुळे पाली सह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.