शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

बाप्पा पावला! पेणमध्ये यंदा कोट्यवधींची उलाढाल; लाखो गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 7:28 AM

पेण तालुक्यातून १४ ते १५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. या व्यवसायातून १३ कोटींची उलाढाल होत आहे.

गडब :

पेण तालुक्यातून १४ ते १५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. या व्यवसायातून १३ कोटींची उलाढाल होत आहे. तालुक्यातून अमेरिका, सिंगापूर, थायलंड आदी देशांसह गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यात गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.

पेण तालुक्यात सुमारे १२००च्या  आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १२ ते १५ लाखांच्या आसपास मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती होते. त्यामुळे सुमारे पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. पेण शहरात गणेश चित्रकला मंदिरात धोंडपाडा उंबर्डे आदी अनेक गावांतील कामगार गणेशमूर्ती घडविण्यासाठी येतात. 

पेण तालुक्यातील पेण शहरासह हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, उबर्डे, गडब, कांदळेपाडा, शिर्की, वडखळ आदी ठिकाणी तालुक्यात गणपतीचे कारखाने आहेत. हे कारखानदार कामगारांकडून रोजंदारीने कामे करून घेत आहेत. त्यांना ४०० ते ५०० रुपये तर जुन्या कामगारांना ६०० ते ७०० रुपये रोज दिला जातो. आखणी कामासाठीचा दर एका छोट्या नगासाठी २० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत असतो. अखेरच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला ४० ते ५० रुपये इतका दर दिला जात आहे. 

या हस्त व्यवसायात निव्वळ ५ ते ६ हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. वस्रालंकार, हिरेजडीत व फेटेवाले गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. यामध्ये दीड ते दोन फुटाची वस्त्रालंकार केलेली गणेशमूर्ती तीन ते चार हजार रुपये, तर हिरेजडीत चार ते पाच हजार रुपयांना मिळते.गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंग    पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने सर्व गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक, पाण्यात विरघळणारे व शरीराला हानीकारक नसणारे रंग पुरविले आहेत.     यासाठी तीन दिवसांचा रंगमहोत्सव पेण शहरात भरवून प्रत्येक कारखानदाराला किमान ११ ते १२ हजार रुपये किमतीचे पर्यावरणपूरक रंग दिल्यामुळे कारखानदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.     या तीन दिवसांत एक हजार मूर्तिकारांनी उपस्थिती दर्शवून यावर्षी किमान पाच लाखांहून अधिक गणेशमूर्ती पर्यावरणपूरक रंगाने रंगविणार आहेत.१२०० च्या  आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १२ ते १५ लाखांच्या आसपास मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती होते. त्यामुळे सुमारे पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. 

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, शाडूची माती, रंग, विजेचे दर, मजुरीचे वाढलेले दर, वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे मूर्तीच्या दरात वाढ करावी लागली असली तरी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मूर्ती देण्याचा प्रयत्न आहे. तर ज्वेलरी व वस्त्रालंकार    व ज्वेलरीच्या मूर्तीना मोठी   मागणी आहे.- नितीन पाटील, श्रीयोग आर्ट्स, गडब 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव