गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:24 PM2019-08-28T23:24:48+5:302019-08-28T23:24:53+5:30

दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा : मूर्तींना मागणी वाढली; मात्र सजावटीचे साहित्य खरेदी कमी

Ganesha festival inflation tally; Increase in the rate of idols | गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या दरात वाढ

गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या दरात वाढ

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्यात सार्वजनिक गणेशमंडळांची मूर्ती आणण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा गणेशमूर्तींच्या दरात वाढ झालेली असली तरी मागणीही वाढल्याने मूर्तिकार आनंदात आहेत. श्रीवर्धनमधील बाजारपेठेत लगबग सुरू झालेली पाहायला मिळते. मात्र, या वेळी महागाईमुळे गणेशोत्सवात खरेदीला ग्राहक कमी प्रमाणात असल्याचे येथील दुकानदार सांगतात. गणेशमूर्तींचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत.


गणेशाचे आगमन सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन परिसरात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मिळून अधिक मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विराजमान होतात. दीड दिवसांच्या १२०० तर पाच दिवसांच्या २५०० गणेशमूर्ती आणि सार्वजनिक एक मूर्ती असून, अनंतचतुर्थीचे ८०० तर २१ दिवसांचे पाच अशी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना बोर्ली-पंचतन परिसरात होणार आहे. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारची कापडी मखरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्तींनी बाजारपेठ सुगंधित केली आहे. गौरी-गणपतीसाठी लागणारे हार लोकांचे लक्ष दुकानांकडे वेधून घेताना दिसत आहेत. लाडू, मोदक, साखरफुटाणे दुकानांवर दिसू लागले आहेत. गौरी-गणपतीची गाणी, फुगड्यांची गाणी, अभंग-भजन, मंत्र व आरत्यांच्या कॅसेट्स, सीडीज आल्या आहेत.

च्वाद्यांच्या दुकानात ढोलकी कारागिरांकडे ढोलकी भरण्यासाठी गर्दी झाली आहे. त्यामुुळे बाजारपेठेत गणेशोत्सवाची चाहूल श्रावण महिन्यापासूनच जणू लागली आहे. आता चाकरमानी मंडळींनाही गावाकडचे वेध लागले आहेत. गावातील लोकही गणरायाचे आगमन होणार असल्याने घरादारांच्या साफसफाईमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. या सणानिमित्त चाकरमानी गावी येणार असल्याने गावातील मंडळींमध्येही उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.


सजावटीच्या कामाला वेग
च्एकीकडे कारखान्यांमध्ये गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरत असताना सार्वजनिक गणेशमंडळांचे मंडप आणि घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. देखावे आणि सजावटीच्या कामांनी वेग घेतला आहे.
दुकाने सजली मात्र ग्राहकच नाहीत
रेवदंडा : गौरी-गणपतीचा उत्सव आता पाच दिवसांवर येऊन ठेपला असून, गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठेत दुकाने सजली असून ग्राहकराजा मात्र भडकलेल्या महागाईने त्रस्त असल्याने अनेक दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागताना दिसत आहे.
जीवनावश्यक वस्तू म्हटल्या की किराणा सामान आलेच, त्या दुकानात कडधान्ये, तेल, साखर आदी वस्तू भडकल्या असल्याने ग्राहकराजा अद्याप हव्या त्या प्रमाणात खरेदी करताना दिसत नाही. पूजेच्या साहित्याची दुकाने सजली असली तरी ग्राहकांची वर्दळ जाणवत नाही. सजावटीच्या साहित्याची दुकाने सजू लागली आहेत. विविध प्रकारची तोरणे, माळा, रंगीत बल्ब विक्रीला दिसत आहेत. प्रसादाचे साहित्य विक्रीला आलेले दिसत आहे.
३दिल्लीतील ढोलकीवाले, गणपती उत्सवाच्या सजावटीतील पडदे फेरीवाले विक्रीला वाहनांतून घरोघरी येताना दिसत आहेत. या वर्षी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने श्रावणातील येणाºया स्थानिक भाज्या उपलब्ध होऊ न शकल्याने घाटमाथ्यावरील भाज्या कडाडलेल्या दिसत आहेत. फुलांची आवक तर पूर्णपणे घटल्याने ऐन गणपतीत फुले वधारलेली राहणार, असा फुलविक्रेत्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
 

महागाईमुळे देशभरातील आर्थिक मंदीचे सावट आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वेळी गणेशोत्सवातील खरेदीसाठी ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
- श्यामकांत भोकरे, दुकानदार , बोर्ली-पंचतन.

Web Title: Ganesha festival inflation tally; Increase in the rate of idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.