अलिबाग : रायगड जिल्ह्यासह ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. चोरीचा माल आॅनलाइन शॉपिंग साइटवर विकण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांसह सोने विकत घेणारे दोघे, अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ३१० ग्रॅम सोन्याचे ऐवज, ३६ मोबाइल फोन, चार लॅपटॉप, तीन एलईडी टीव्ही, एक फोर व्हीलर आणि एका टू व्हीलरचा समावेश आहे. बाजारात या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे २३ लाख असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केली.मौअजम अली हुसेन शेख (२४, सावर्डे-चिपळूण), ईश्वर रमेश अडसुळे (३३, शिरढोण-कोल्हापूर), राकेश राजेंद्र चांदीवडे (३१, कोपरखैरणे-नवी मुंबई), सनी छोटू जैसवाल (२८, सावर्डे-चिपळूण), प्रवीण विष्णू कांदे (२७, नालासोपारा-ठाणे), शरद नारायण घावे (२४, वसई-ठाणे) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील सोने विकत घेणाºया दोन सोनारांनाही पकडण्यात आले होते. पैकी एका सोनाराला जामीन झाला आहे.२०१७ आणि २०१८ या कालावधीत घरफोडींच्या सत्राने रायगड जिल्हा चांगलाच हादरून गेला होता. या कालावधीत मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्या होत्या. १८ पैकी १६ घरफोडी या एकट्या रायगड जिल्ह्यातील, तर कोल्हापूर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येकी एका घरफोडीचा समावेश आहे. पोलिसांनी प्रथम मौअजम अली हुसेन शेख याला अटक केली. याच्या नावावर गुन्हे असल्याने त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या अन्य पाच साथीदारांना अटक करण्यात आल्याचे पारस्कर यांनी सांगितले.अटक आलेल्या आरोपींनी रसायनी, पेण, दादर सागरी पोलीस ठाणे, कोलाड, रोहे, माणगाव, म्हसळा, ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली, अशी माहिती पारस्कर यांनी दिली. त्याचप्रमाणे चोरी केल्याची ठिकाणेही त्यांनी दाखवली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जावेद शेख यांनी व्यक्त केली.चोरीचा माल विकण्यासाठी आॅनलाइनचा आधारसध्या आॅनलाइन शॉपिंगचा जमाना आहे, त्यामुळे घरबसल्या शॉपिंग करण्याचा कल वाढलेला आहे. हे चोरट्यांनी हेरून चोरलेला मॉल विकण्यासाठी आॅनलाइन बाजारपेठही शोधली होती. प्रसिद्ध असणारी ओएलएक्स ही आॅनलाइन शॉपिंग साइट चोरट्यांनी मोबाइल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही विकण्यासाठी निवडली होती. आतापर्यंत त्यांनी या पद्धतीने दोन लॅपटाप, एलईडीटीव्ही आणि काही मोबाइल विकले असल्याचे पारस्कर यांनी सांगितले.अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांतील घरफोडींचे कायअलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रकार झाले आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलेला आहे; परंतु या ठिकाणी घरफोडी करणाºयांनी अद्यापही रायगड पोलिसांना गुंगारा दिला आहे. त्यांना पकडण्यात यश आलेले नसले, तरी लवकरच पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असे पारस्कर यांनी सांगितले.
घरफोड्यांच्या टोळीला रायगडमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:01 PM