शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
3
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
4
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
5
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
6
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
7
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
8
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
9
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
10
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
11
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
12
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
13
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
15
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
16
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
17
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
18
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
19
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
20
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

दागिने चोरीत महिलांची टोळी

By admin | Published: June 17, 2017 12:50 AM

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीने महिलांना बेजार केले असून, पोलिसांची झोप उडवली आहे.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीने महिलांना बेजार केले असून, पोलिसांची झोप उडवली आहे. मात्र पोयनाड पोलीस ठाण्यातील जागरूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे तिघींना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पोयनाड एसटी स्टॉपवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने व रोकड लंपास करून फरार झालेल्या तीन महिलांना पोयनाड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक के ली. त्यांच्याकडून ४७ हजार २५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल परत मिळविण्यात यश मिळविले आहे. या तीनही महिला मुंबईतील बोरीवली येथील हायवे ब्रिजच्या खालील झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत.एक महिला प्रवासी पोयनाड बस स्टॅण्ड येथून बसमध्ये बसून अलिबाग येथे जात असताना तिकीट काढण्यासाठी पर्समध्ये हात घातला असता त्यांना पर्स चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या लगेच पेझारी नाका येथे उतरल्या व आपल्या पतीस फोन करून हकिकत सांगून त्यांच्या मदतीने पोयनाड पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. पोयनाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोयनाड नाका येथे जाऊन, तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात आरोपी महिला कैद झाल्या होत्या. पोलिसांनी तपासाअंती कार्लेखिंडीच्या पुढे एका झाडाखाली या तिघींना अटक केली. त्यांच्याकडे चोरीचे ४७ हजार २५० रुपये किमतीचे दागिने व रोकडही सापडली.