१९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 12:54 AM2019-04-21T00:54:26+5:302019-04-21T00:55:18+5:30

मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोग सातत्याने आवाहन करून, नवमतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करत आहे.

Gangubai Chavan, who has been voting since 1952 | १९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण

१९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण

Next

- दीपक साळुंखे 

मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोग सातत्याने आवाहन करून, नवमतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वप्रथम १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा हक्क न चुकता बजावून खºया अर्थाने लोकशाही अबाधित राखण्याच्या प्रक्रियेत अनन्य साधारण कामगिरी बजावलेल्या महाड तालुक्यातील आमशेत या छोट्या गावातील तब्बल ११० वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई विठ्ठल चव्हाण या यंदाच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत २३ एप्रिललाही मतदान करणार आहेत.

१९५२ पासून तुम्ही मतदान करताय, त्याच्या काही आठवणी सांगा?
१ जानेवारी १९०८ रोजी माझा जन्म झाला, १९५२ मध्ये तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघात झालेल्या सी. डी. देशमुख (काँग्रेस) विरुद्ध राजाराम राऊत (शेकाप) अशा पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे आठवते; परंतु त्या वेळच्या आठवणी मात्र सांगता येणार नाहीत. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत महाडचे काँग्रेस नेते शंकरराव बाबजी सावंत तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांच्या लोकसभा निवडणुकीत मतदान के ले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाडचे आमदार नानासाहेब पुरोहित आणि आमदार शांतारामभाऊ फिलसे यांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याचे मला आठवते. गतवर्षी आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या महाड तालुक्यातील आमशेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही मी मतदान केले.

एवढे वय झाल्यानंतरही न चुकता मतदान करता?
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांमध्ये आपण न चुकता मतदान केले. गेल्या आठ-दहा वर्षांपासून वृद्धापकाळामुळे चालण्याचा त्रास होत असल्याने त्या मतदानाच्या दिवशी कुटुंबीयांकडे मतदानासाठी घेऊन जाण्याचा आग्रह धरते.

माझ्या कुटुंबातील सदस्य मुलगा सुधाकर विठोबा चव्हाण, सून सुजाता सुधाकर चव्हाण, नातू बाबुराव सुधाकर चव्हाण, नातसून प्रणाली बाबुराव चव्हाण आणि गणेश चव्हाण असे सगळे जण न चुकता मतदानाला जातात. मी त्यांना नेहमीच मतदानासाठी प्रोत्साहित करत असते. आजवर कधीच मतदान करण्याची संधी मी गमावली नाही.

नुकताच साजरा केला ११० वा वाढदिवस
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये गंगूबाई चव्हाण नेहमीच मतदानाचा हक्क बजावत असतात. सरकार सत्ता कोणाचीही गंगूबाई चव्हाण आपल्या मतदानाचा हक्क नेहमीच बजावत असतात. गंगूबाई यांच्या वयाचा ११० वा वाढदिवस गुरुवारीच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
 

Web Title: Gangubai Chavan, who has been voting since 1952

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.