शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! गौरी गणपतीचं शांततेत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:03 AM

विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील घरगुती गौरीगणपतींचे विसर्जन उत्साहात करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. या वेळी बोर्लीपंचतन परिसरात सार्वजनिक १ तर ४५०५ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यातील ९०० गौरींचे व २५०० गणेशमूर्ती मिळून एकूण ३४०० गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गेले पाच दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.

विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले. तर दुसरीकडे बहुंताश ठिकाणी गणेशोत्सवातून सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. या वेळी बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतोय. त्याचप्रमाणे विर्सजन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी पोलीस व जीवरक्षक तैनात होते.गणराय विराजमान होण्याचा दिवस यानंतर पाच दिवसांमध्ये घरोघरी बाप्पासमोर भजन, आरतीने केले जाणारे जागरण, तो क्षण पाहता सर्व उत्सवावर कोरोनाचे सावट असताना या गणेशोत्सवामुळे सर्वत्र नवचैतन्य आले होते. गुरुवारी आपल्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने भक्तगणात थोडीफार नाराजी दिसून येते. मात्र, यावर भक्तगण उत्साही अशा संमिश्र वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत गणरायाला भावपूर्ण निरोप देत होते.तळा तालुक्यात साधेपणाने निरोपशनिवारी २२ आॅगस्ट रोजी विराजमान झालेल्या गणपतींना पाच दिवसांच्या सेवेनंतर गौरीसह साधेपणाने निरोप देण्यात आला. दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करणारे गणेशभक्त बाप्पाचे विसर्जनही तितक्याच उत्साहात करतात. मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी कोरोनाचा धसका एवढा घेतला की उत्साहाचे उसने अवसान आणल्यासारखा हा उत्सव साजरा करण्यात आला. आरती, भजनाचे सूर तर दूर राहिले घराघरांत वाजविली जाणारी गणेशगीतेही कानावर पडली नाहीत. नागरिकांनी कोणताही गाजावाजा न करता हातगाडीवर गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जन घाटावर तळा नगरपंचायतीकडून निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. आरती समाप्तीनंतर भाविकांकडून आपल्या लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.नागोठणेत अंबा नदीच्या घाटावर शांततेत विसर्जनगौरी - गणपतीचा विसर्जन सोहळा शहरात गुरुवारी विविध ठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. दुपारी तीननंतरच शहराच्या विविध भागांतील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते. आंगरआळीतील गणेशमूर्ती शृंगार तळे, खडकआळीतील जोगेश्वरी मंदिरासमोरील तलावात तर, प्रभुआळीतील गणेशमूर्तींचे रामेश्वर मंदिरासमोरील तलावात विसर्जन करण्यात आले. मुख्य विसर्जन सोहळा अंबा नदीच्या घाटावर पार पडला. या ठिकाणी दुपारी साडेतीनला पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जनासाठी गणपतीच्या मूर्तींची रांग लागण्यास प्रारंभ झाला होता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव