लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : शहराच्या मुख्य बाजारपेठेत भाजीविक्रे ते आणि दुकानदार कचरा रस्त्यावर टाकत असल्याने आता पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा भाजीविक्रे ते आणि दुकानदारांवर नगरपालिके ने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कर्जतमधील रहिवाशांचे आराध्य दैवत असलेल्या श्री धापया मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्जत शहर बाजारपेठेतील भाजीविक्रेते सडलेला भाजीचा कचरा रात्रीच्या वेळी आणून टाकत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. सकाळच्या वेळी श्री कपालेश्वर मंदिर आणि धापया मंदिरात येणाऱ्या भक्तांस तसेच रात्रीच्या वेळेस कामावरून आलेल्या चाकरमान्यांना नाकाला रु माल लावून या घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. रोज सायंकाळच्या वेळी कचरा घेऊन जाण्यासाठी कर्जत नगरपालिकेची घंटागाडी कर्जत बाजारपेठेतून जात असते. मात्र, बाजारपेठेतील भाजीविके्रते आपला कचरा घंटागाडीमध्ये न टाकता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य रस्त्यावरच टाकत आहेत. सडलेल्या भाज्यांचा कचरा मुख्य रस्त्यावर टाकल्यामुळे शहर विद्रूप होत असून, पावसाळ्यात सडलेल्या कचऱ्यावरील मच्छरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्यामुळे रस्त्यात उघड्यावर टाकलेल्या सडलेल्या भाज्यांच्या कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या भयंकर आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी स्थानिक प्रशासनाने रस्त्यात उघड्यावर सडलेल्या भाज्यांचा तसेच इतरही कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.नगरपरिषद प्रशासनाने कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे. कचरा उचलण्यासाठी गाडी बाजारपेठेत फिरत असते. मात्र, काही भाजीविके्र ते आणि दुकानदार कचरा रस्त्यावर टाकत आहेत, त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाईल.- दादाराव अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद
कर्जत बाजारपेठेत कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:26 AM