कचरा देशाला भेडसावणारी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:32 AM2018-01-17T01:32:19+5:302018-01-17T01:32:19+5:30

कर्जतच्या इतिहासामधील आजचा दिवस चांगला आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मितीबरोबर कचºयाचे विघटन महत्त्वाचे आहे, कचरा देशाला भेडसावणारी समस्या आहे

Garbage Problems in the country | कचरा देशाला भेडसावणारी समस्या

कचरा देशाला भेडसावणारी समस्या

Next

कर्जत : कर्जतच्या इतिहासामधील आजचा दिवस चांगला आहे. या प्रकल्पातून वीजनिर्मितीबरोबर कचºयाचे विघटन महत्त्वाचे आहे, कचरा देशाला भेडसावणारी समस्या आहे, स्वच्छतेविषयी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आ. सुरेश लाड यांनी के ले.नगरपरिषद हद्दीतील मौजे मुद्रे येथील अग्निशमन केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पाचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी लाड बोलत होते.
नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गटनेते राजेश लाड यांनी प्रास्ताविकात स्वच्छतेच्या दृष्टीने हा बायोगॅस प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे सांगितले. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी ओल्या कचºयापासून बायोगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा हा प्रकल्प आहे. स्वच्छतेमध्ये कर्जत नगरपरिषद नंबर एकवर असेल असा विश्वास व्यक्त
के ला.
याप्रसंगी गटनेते राजेश लाड, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, सभापती लालधारी पाल, सभापती पुष्पा दगडे, सभापती मिलिंद चिखलकर, सभापती उमेश गायकवाड, नगरसेविका अर्चना बैलमारे, अरु णा वायकर, सुवर्णा जोशी, बिनिता घुमरे, शीतल लाड, सई वारे आदी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान व नागरी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ यातील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कर्जत नगरपरिषदेने ओल्या कचºयावर प्रक्रि या करण्यासाठी भाभा अणुशक्ती रिसर्च सेंटरने निसर्ग तंत्रज्ञानावर आधारित पाच मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीत निर्माण होणाºया ओल्या कचºयावर म्हणजेच भाजी मंडईतील, हॉटेलमधील व नागरिकांकडून वर्गीकृत स्वरूपात प्राप्त होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रि या करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे कर्जत शहरातील ओला कचरा डम्पिंग ग्राउंडवर न जाता त्यावर बायोगॅस प्रकल्पात प्रक्रि या करण्यात येणार आहे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडची जागा व वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे.
या प्रकल्पात ५००० किलो ओल्या कचºयावर प्रक्रि या केल्यास दररोज १०० किलो गॅस मिळणे अपेक्षित आहे. या गॅसवर जनरेटर चालवून त्यापासून वीजनिर्मिती करणे प्रस्तावित आहे.
नगरपरिषदेच्या मालकीच्या चार गुंठे जागेत सुमारे एक कोटी रु पये खर्च करून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. डोंबिवली येथील औवनी एंटरप्राइजेसने या प्रकल्पाचे काम केले आहे.

Web Title: Garbage Problems in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.