कर्जतमध्ये गॅस पाइपलाइन कंपन्यांची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:54 AM2017-08-01T02:54:18+5:302017-08-01T02:54:18+5:30

ज्याच्या विरुद्ध कर्जत तालुक्यातील शेतकरी प्रथमच मोठे आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरला त्या गॅस पाइप लाइन कंपनीने आपले रंग दाखविण्यास सुरु वात केली आहे.

Gas Pipeline Companies Dardagiri in Karjat | कर्जतमध्ये गॅस पाइपलाइन कंपन्यांची दादागिरी

कर्जतमध्ये गॅस पाइपलाइन कंपन्यांची दादागिरी

Next

कर्जत : ज्याच्या विरुद्ध कर्जत तालुक्यातील शेतकरी प्रथमच मोठे आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरला त्या गॅस पाइप लाइन कंपनीने आपले रंग दाखविण्यास सुरु वात केली आहे. सध्या शेतीचा हंगाम असून शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी आग्रही आहे. मात्र शेतकºयांच्या कोणत्याही विरोधाची तमा न बाळगता गॅस कंपन्यांनी शेतातून पाइप लाइन टाकण्याची तयारी सुरू केली आहे.
तालुक्यातील राजनाला कालवा परिसरातील शेतकरी मेहनती आहे. मात्र त्या भागातून सलग दुसºयांदा गॅस पाइप लाइन टाकली जाणार आहे. तालुक्यात गॅस पाइप लाइनच्या विरोधात मोठे आंदोलन मागील दोन वर्षांत उभे राहिले होते. त्यात राजनाला विभागातील शेतकरी आघाडीवर होता. अनेक शेतकºयांचा विरोध हा प्रचंड टोकाचा असताना देखील त्या भागात गॅस पाइप लाइन कंपन्यांनी आपले हातपाय पसरविले आहेत. संबंधित गॅस पाइप लाइन कंपन्यांनी शेतकºयांचा विरोध असताना देखील त्यांच्या जमिनीतून पाइप लाइन टाकली जाणार म्हणून दबाव निर्माण करण्यास सुरु वात केली आहे. सध्या सुरू असलेला पावसाळा लक्षात घेऊन शेतकरी कामात मग्न झाला आहे. मात्र टाटा परिसरातील शेतकºयांना शेतात लावणीच्या काळजीपेक्षा जमिनीत भात शेती लावायला जमीन राहील का? असा प्रश्न या भागातील शेतकºयांना पडला आहे. कारण गॅस पाइप लाइन कंपनीने शेतकºयांच्या शेतात गॅस पाइप लाइनचे पाइप टाकून दिले आहेत. त्यात ते पाइप त्या त्या ठिकाणी नेवून टाकून देण्यासाठी वापरलेल्या अवजड वाहनांनी शेतात खड्डे पाडून ठेवले आहेत. त्यामुळे शेतकºयांना शेतात उतरणे कठीण झाले आहे.

Web Title: Gas Pipeline Companies Dardagiri in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.