पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:33 PM2019-06-02T23:33:52+5:302019-06-02T23:34:02+5:30

५० जणांना उलटी-जुलाब : पिण्यासाठी वापरतात विहिरीचे पाणी; प्राथमिक आरोग्य केंद्र, पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Gastro infection due to contaminated water in Carmeli village of Pen Taluka | पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

Next

वडखळ : पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे सुमारे ५० ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात व कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

कामार्ली ग्रामस्थ हे गावातील विहिरीचे पाणी वापरतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ग्रामस्थ जेवण करून झोपले असताना अचानक रात्री ९ च्या सुमारास गावातील सुरेश धर्मा वाघमारे (३०), संदीप यशवंत पवार (१८), माधुरी सुरेश वाघमारे (१८), जया दिलीप माने (३०), प्रमोद हरिभाऊ पाटील (३२), चंद्रकांत विठ्ठल टेमघरे (४०), तारामती कानू पाटील (७०), मीना किशोर पाटील (२३), जान्हवी सुभाष पाटील (१९), मनीषा रघुनाथ लेंडे (४५), मीनाक्षी मनोहर लखिमले (२१), सुधा सुदाम पाटील (४०), कविता मनोहर लखिमले (२०), सेजल सुरेश मुसळे (२१) सर्व रा. कामार्ली यांना शुक्रवारी रात्रीपासून उलटी, जुलाब, पोटात मळमळणे असा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

तर सानिका पाटील, प्रकाश कदम, प्रभावती लखिमले, वैष्णवी पिंगळे, सायली हडप, सायली पाटील, निशिका पाटील, सेजल मुसळे, नमिता अनगत, दया अनगत, लक्ष्मी पाटील, दीक्षिता पाटील, वामन लखिमले, सिद्धार्थ पाटील, सविता लखिमले, स्मरण लखिमले, सुलभा टेमघरे, स्मिता लखिमले, मोहिनी लखिमले, देवता पाटील, मोहन लखिमले, विकास पाटील, अनुष्का पाटील, गौरव लखिमले, अर्चना ठोंबरा, राजश्री पाटील, सुधा पाटील, मीनाक्षी लखिमले, कस्तुरी पाटील, तारामती मानकवळे, सायली मते, सुनिता पाटील, शरद पाटील, तुळशीदास पाटील यांच्यावर कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सुलोचना पाटील, प्रतिभा पाटील, अनिकेत पाटील यांच्यावर पेण-अंतोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत माहिती मिळताच आमदार धैर्यशील पाटील, पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव, जि.प. सदस्या नीलिमा पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बापू दळवी, मांगरुळ सरपंच नीता दळवी, मांगरुळचे माजी सरपंच मंगेश दळवी, अ‍ॅड. सुरेश दळवी आदीनी कामार्ली गावात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. काही रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Web Title: Gastro infection due to contaminated water in Carmeli village of Pen Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.