शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 2:10 AM

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण

दत्ता म्हात्रे 

पेण : माहेरवाशिणी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो आनंदाचा क्षण म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा होय. असे म्हणतात की, महालक्ष्मी देवीला माहेरपणाचे सुख अनुभवावेसे वाटले तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा दिवस अशी आख्यायिका पुराणातील कथांमध्ये आढळते. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईच्या आगमनाची प्रतीक्षा लागते. कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, इतके औत्सुक्य गौराईच्या आगमनप्रसंगी असते. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड जंजिरा व मुंबई, ठाणे आगरी-कोळी पट्ट्यात गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो.

गौराई घरात येणार या अनुभूतीनेच गौरीची आरास, तिचा साजश्रुंगार व तिच्या नैवेद्यापर्यंतची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू केली जाते. माहेरवासिनींना गौरी सणात माहेरच्या आठवणींना उजाळा देता येतो. मानवी समाज संस्कृतीतील बालपणीच्या बालहट्ट, रुसवे, फुगवे प्रकट करण्यासाठी गौरी-गणपती सण उत्सव हे मोठे व्यासपीठ आहे. गौराईच्या आगमनाची सासरवासिनी आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती आगमन झाल्यानंतर चार दिवसांनी गौराईचे आगमन होते. स्थळपरत्वे गौरीची सजावट, साजश्रुंगार व नैवेद्य दाखविण्याची प्रथा, परंपरा वेगवेगळी असते. मुंबई, ठाणे, रायगड, तळकोकणात या सणाचा उत्साह शिगेला पोहोचतो.ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होते म्हणून महालक्ष्मीला ज्येष्ठा गौर तर तिची सखी पार्वती कनिष्ठा. जगाच्या पालनकर्ती या आद्यशक्तीची पाद्यपूजा व माहेरपणातील गोड स्मृतींना उजाळा देण्यासाठी या गौराई बनून ही गौर कुटुंबव्यवस्थेतील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी भाद्रपद महिन्यात अवतरतात. तर आश्विन महिन्यात नवदुर्गेचे रूप घेऊन शक्तिपीठात पाद्यपूजेचा मान घेतात. कोकणात गौरीपूजेचा थाटमाट काही औरच असतो. गुरुवारी गौराईचे आगमन झाले आहे. शुक्रवारी पूजन तर शनिवारी विर्सजन होईल. अशाप्रकारे अडीच दिवसांचा पाहुणचार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गौरी या प्रामुख्याने खड्यांच्या, तेरड्याच्या, मुखवटे, शाडूमातीच्या मूर्तीरूपात मांडल्या जातात.प्राचीन परंपराच्दोन दिवस रात्रभर नाचगाणी, गप्पाटप्पा, उखाणे म्हणत महिलांची व सखींची धम्माल सुरू असते. नवविवाहितांचा पहिला माहेरपण म्हणून गौरीची पूजापाठ संपन्न होते.च्पाच सुपांमध्ये फळे, फुले, पाच प्रकारच्या भाज्या, धान्य, नारळ, काळे मण्यांचा पोत, हिरव्या बांगड्या, हळदकुंकू भरून गौरीची ओटी भरली जाते. याला ओवसा म्हणतात.च्गौरीचे आगमन सुखसमृद्धीचे प्रतीक असल्याने माहेरवाशिणींची ही प्राचीनकाळापासून परंपरा चालत आली असून ती आजसुद्धा पाळली जाते. विसर्जनाच्या मध्यरात्री गौरीच्या आणलेल्या विविध वनस्पतीच्या पत्री नवीन सुपात गौरीच्या जवळ ठेवतात.च्तो तिचा ओवसा आरतीनंतर पाच सुवासिनी पाठवणीची गाणी गात घरभर फिरवतात, या वेळी गौराईचा माहेरवास संपतो.कर्जत : गौरीचे गुरु वारी आगमन असल्याने सुवासिनींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. काही आदिवासी महिला गौरीची (कचोऱ्याची) फुले, कमळाची फुले, सुपे, तेरड्याची रोपे, केळीची पाने विकण्यासाठी बाजारात आणली होती. तर काहींनी रानात जाऊन कचोºयाची फुले आणून घराबाहेर ठेवली. त्यानंतर संध्याकाळी सुवासिनींनी गौरी आगमनाचे सर्व साहित्य तळ्यावर नेऊन तेथे सारी बांधाबांध करून दिवेलागणीच्या वेळी तयार केलेल्या गौरी घरी आणल्या.बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दीच्रेवदंडा : महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सण म्हणजे गौरींचे आगमन सोनपावलांनी झाले.च्पावसाचा जोर असताना महिलांना गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. हलवाई दुकानात ग्राहकांची वर्दळ जाणवत होती.च्रेवदंडा गावात नाचºया गौरींचे आकर्षण आजही असल्याने चाकरमानी मंडळी गावाकडे त्यासाठी मुक्काम हमखास करतात. नाचºया गौरी सजवण्यासाठी महिलांची लगबग सकाळपासूनच सुरू होती. 

टॅग्स :RaigadरायगडGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganpati Festivalगणेशोत्सव