जयंत धुळप/रायगड, दि. 31 - अलिबाग समुद्र किनारी जीवरक्षक (लाईफगार्ड) म्हणून वर्षभर कार्यरत 40 तरुणांच्या सेवेची विशेष दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या हेतून रायगड पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रशिस्तपत्र प्रदान करुन गुरुवारी या जीवरक्षकांचा गौरव करण्यात आला. अलिकडेच पाच पर्यटकांचे प्राण वाचविण्यात या जीव रक्षकांना यश आले आहे तर गेल्या वर्षभरातील ही संख्या सुमारे 60 असल्याची माहिती या जीवरक्षक चमुचे प्रमुख माजी नगरसेवक संजय सारंग यांना दिली.अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग समुद्र किनारी केले होते. गणेश विसर्जनातही हे जीवरक्षक सहकार्य करित आहेत.
अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील 40 लाईफ गार्ड्सचा रायगड पोलीस दलाकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 7:36 PM