कबड्डी स्पर्धेत गावदेवी भातसई संघ विजयी
By admin | Published: January 10, 2017 06:07 AM2017-01-10T06:07:33+5:302017-01-10T06:07:33+5:30
रोहा तालुक्यातील स्वर्गीय कुसुमताई पाशिलकर कबड्डी स्पर्धेच्या स्मृतिचषकावर गावदेवी भातसई संघाने विजय संपादन के ला. मान्यवरांच्या उपस्थितीत
धाटाव : रोहा तालुक्यातील स्वर्गीय कुसुमताई पाशिलकर कबड्डी स्पर्धेच्या स्मृतिचषकावर गावदेवी भातसई संघाने विजय संपादन के ला. मान्यवरांच्या उपस्थितीत या संघांच्या बहादर खेळाडूंना प्रथम क्र मांकाचे मानकरी ठरल्याबद्दल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दोन दिवसीय सुरू असलेल्या या स्मृतिचषक कबड्डी सामन्यात १२८ संघांनी सहभाग घेतला होता. धाटावमधील प.पु.पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीसुद्धा अलिबाग येथील नियोजित कार्यक्र माच्या दौऱ्यादरम्यान धावती भेट दिली.
अजित पवार म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. अध्यक्ष असताना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रथम श्रेणीतील सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे,’ असे सांगून कबड्डी खेळात रायगडचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक केले. तर क्र ीडा क्षेत्राला राज्याश्रय देण्याचे काम शरद पवार यांनी, तर मैदानी खेळाला सार्वभौम प्रतिष्ठा देण्याचे काम अजित पवारांनीच केल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. चुरशीच्या लढाईत अंतिम फेरीत अखेर गावदेवी भातसई (ब) संघाने सामना स्वत:च्या पारड्यात घेतला. तर द्वितीय क्र मांकाचा काळभैरव उडदवणे संघ मानकरी ठरला. सोनारसिद्ध धाटाव संघाने तृतीय, तर गावदेवी भातसई (अ) संघाने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. (वार्ताहर)