महाव्यवस्थापकांना साकडे

By admin | Published: February 14, 2017 04:57 AM2017-02-14T04:57:59+5:302017-02-14T04:57:59+5:30

मिनीट्रेन मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. ही रेल्वे सेवा लवकर पूर्वपदावर आणावी यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा

To General Manager | महाव्यवस्थापकांना साकडे

महाव्यवस्थापकांना साकडे

Next

माथेरान : मिनीट्रेन मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. ही रेल्वे सेवा लवकर पूर्वपदावर आणावी यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांची नेरळ रेल्वे स्थानकात माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदन देताना उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेविका सुषमा जाधव, नगरसेवक राकेश चौधरी, सचिन दाभेकर यासह मान्यवर उपस्थित होते. रविवारी दुपारी ४.३० वाजता रेल्वे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचे नेरळ स्थानकात आगमन झाल्यावर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनीट्रेन बंद असल्यामुळे येथील पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला असून सर्वांच्या उदरनिर्वाहाची गहण समस्या निर्माण झाली आहे. पर्यटक हे मिनीट्रेनच्या आकर्षणामुळे येथे भेट देत असतात, परंतु ही गाडी बंद असल्याने मागील आठ महिन्यांपासून स्थानिकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. सध्या सुरू असलेली रेल्वे दुरु स्तीची कामे मंद गतीने सुरू आहेत. ती पूर्णत्वास नेऊन आगामी पर्यटन हंगाम समीप येत असल्याने लवकरच ही सेवा सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन स्थानिकांच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी शर्मा यांना दिले. यावेळी त्यांच्याबरोबर विस्तृतपणे चर्चा सुध्दा करण्यात आली. या रेल्वे मार्गावरील धोकादायक त्रुटी भरून काढल्यानंतरच आम्ही पुढील तजवीज करणार आहोत. एप्रिल २०१६ मध्ये बनविलेले नवीन बनावटीचे इंजिन सध्या येथील ताफ्यात आहे. लवकरच हा मार्ग दुरु स्त करून सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर ही सेवा सर्वांसाठी खुली करण्यात येईल, असे आश्वासन डी.के.शर्मा यांनी उपस्थितांना दिले.

Web Title: To General Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.