मच्छीमारांचे बायोमेट्रिक कार्ड जिल्ह्यात मिळावे
By admin | Published: September 9, 2016 03:07 AM2016-09-09T03:07:48+5:302016-09-09T03:07:48+5:30
खोल समुद्रात मच्छिमारी करताना शासनाने प्रत्येक कोळी बांधवाकडे बायोमेट्रिक कार्ड असणे बंधनकारक के लेआहे. सुरक्षेसाठी ते आवश्यक आहे
नांदगाव/ मुरु ड : खोल समुद्रात मच्छिमारी करताना शासनाने प्रत्येक कोळी बांधवाकडे बायोमेट्रिक कार्ड असणे बंधनकारक के लेआहे. सुरक्षेसाठी ते आवश्यक आहे, मात्र महाराष्ट्रात हे कार्ड मिळवण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. कोकणात मासेमारी करणारे लोक बहुसंख्य आहेत. परंतु हे बायोमेट्रिक कार्ड देणारी मुख्य एजन्सी केरळ राज्यातील पलक्कड येथे आहे. येथूनच संपूर्ण महाराष्ट्रात या कार्डचे वितरण होते. राज्य सोडून पर राज्यात एजन्सी असल्याने मच्छिमारांना हे कार्ड वेळेवर मिळत नाही एक कार्ड मिळण्यासाठी एक वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत वाट पाहावी लागत असेल तर हे कार्ड जिल्ह्यातच मिळावे अशी आग्रही मागणी सागरकन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष्य मनोहर मकू यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे निवेदन मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती मकू यांनी दिली.
सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे सभासद व बोटीवरील खलाशी बायोमेट्रिक कार्डसाठी सोसायटीमध्ये येतात, त्यावेळी याचे अर्ज भरून स्थानिक परवाना अधिकारी वर्गाकडे दिले जातात. तदनंतर हे कार्ड तेथून येण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर मुंबई सारख्या ठिकाणी बोटीची तपासणी होते. यावेळी बायोमेट्रिक कार्ड जर नसेल तर खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागून वेळ, श्रम व पैसे याचा नाहक भूर्दंड मासेमारी करणाऱ्यांना सहन करावा लागतो.
संपूर्ण कोकणात मच्छिमारी करणारे लोक तीन लाख ८६ हजार असून बायोमेट्रिक कार्ड मुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा याबाबींचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून प्रत्येक जिल्हातील मच्छिमारांना ते राहत असलेल्या जिल्ह्यातच बायोमेट्रिक कार्ड प्रदान करण्यात यावे अशी आग्रही मागणी मकू यांनी मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. (वार्ताहर)