शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भरावामुळे घारापुरी बेटाची धूप

By admin | Published: December 27, 2016 2:41 AM

जेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध

- मधुकर ठाकूर,  उरणजेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध बंदिस्ती, संरक्षक तट सागरी लाटांमुळे पार उद्ध्वस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी बेटालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर संरक्षक भिंतीचे काम झालेच नसल्याने बेटावरील चहुबाजूंच्या सागरी किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. घारापुरी बेटावर समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून १० मीटर आत घुसू लागले आहे. रहदारीचे रस्तेही पाण्याखाली जाऊ लागले आहेत. बेटाच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराचा विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे भराव के ले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. परिणामी समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती, संरक्षक तट उद्ध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने वाढू लागले आहे. जेएनपीटीच्याकामामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. या जनसुनावणीदरम्यान प्रकल्प आणि पर्यावरणाबाबत तक्रारी, सूचना, टीका टिप्पणीवर चर्चा केली जाणार आहे. जनसुनावणीला अनुसरून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.पर्यटक आणि नागरिकांसाठी रहदारीसाठी असलेले प्रमुख रस्तेही इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आणि त्याकडे शासन, जेएनपीटीने वेळीच लक्ष दिल्यास बेटावरील रहदारीसाठी उरलेले रस्तेही समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती बळीराम ठाकूर यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर देश-विदेशातून वर्षभर लाखो पर्यटक ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी येतात. मात्र अशा या जागतिक दर्जा लाभलेल्या बेटासभोवार असलेल्या सागरी किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होवून समुद्राच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनानेही दुर्लक्षच चालविलेले आहे. जेएनपीटीच्या विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात सातत्याने होणाऱ्या प्रचंड भरावामुळे सागरी किनाऱ्यांची होणारी धूप, समुद्राच्या सातत्याने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे बेटाला होऊ पाहणाऱ्या धोक्याबाबत जेएनपीटीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी घारापुरी ग्रा. पं. ने केली होती. बेटावर समुद्रातून येणारा कचरा, प्लास्टिक आणि तेलतवंगामुळे सागरी किनारा पार काळवंडला आहे. तसेच दुर्मीळ खारफुटीची झाडेही नष्ट होत चालली आहेत. सातत्याने येणाऱ्या कचऱ्यामुळे किनारपट्टी दुर्गंधीयुक्त बनत चालली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे. बेटाच्या होत चाललेल्या विद्रूपीकरणाचे विदेशीपर्यटक चित्रीकरण करीत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील बेटाचे नाव खराब होत चालले आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तक्रारीतून लक्ष वेधले आहे. जेएनपीटीच्या चॅनेलची खोली वाढविणे, चौथे बंदर उभारण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. सागराच्या प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोरा बंदर, राजबंदर या तिन्ही गावांवर असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. सर्वाधिक राजबंदर जेट्टी ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने पार दुर्दशा झाली आहे. जमिनीच्या झालेल्या प्रचंड धूपमुळे पार खचून गेला आहे.- बळीराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, घारापुरी