शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

घाटमाथ्यावरील मतदार ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:45 PM

मावळमध्ये मतदारांच्या संख्येत वाढ : पनवेलकडेही प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष

अरुणकुमार मेहत्रे ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर घाटावर आणि घाटाखाली असा परिसर आहे. घाटावरील पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात रायगडपेक्षा ७३ हजार ५०० मतदार जास्त आहेत. त्यामुळे तेथील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघात मतदार वाढले आहेत.

निवडणूक आयोगाकडून २००९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी, चिंचवड व मावळ असे घाटावरील म्हणजे पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी व चिंचवड हा शहरी भाग आहे. सर्वात श्रीमंत महापालिकेचाही यात समावेश आहे. येथे आठ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघाचा आकडा सव्वातीन लाखांच्यावर आहे. तीनही मतदारसंघात साडेअकरा लाखांच्या पुढे मतदार आहेत. घाटाखालचा विचार केला तर कर्जतच्या विधानसभा मतदारसंघात खालापूर तालुक्याचाही समावेश आहे. कर्जत-खालापूरचे मतदार पावणेतीन लाख आहेत. उरणची विधानसभा मतदारसंघाचा आकडाही वाढला आहे. सर्वाधिक मतदार पनवेल विधानसभा मतदारसंघात आहेत. येथे मतदारांनी पाच लाखांचा आकडा ओलांडला आहे.

विधानसभेला हा आकडा सव्वापाच लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. येथील मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घाटावर तीनही मतदारसंघाचे मतदार निर्णयक ठरू शकतात. हा आकडा पाऊण लाखाने जास्त आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीचा विचार केला, तर मतदारसंख्या सव्वा लाखांपेक्षा कमी होती. आता हा फरक हजारांवर आला आहे.

टॅग्स :maval-pcमावळ