मुलींनी मारली बाजी

By admin | Published: June 14, 2017 03:14 AM2017-06-14T03:14:09+5:302017-06-14T03:14:09+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या मंगळवारी आॅनलाइन निकालानुसार रायगड

Girls beat up | मुलींनी मारली बाजी

मुलींनी मारली बाजी

Next

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या मंगळवारी आॅनलाइन निकालानुसार रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.९३ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून ९२.१३ टक्के मुली तर ८७.९९ टक्के मुले उत्तीर्ण झाले
आहेत.
रायगड जिल्ह्यातील ५३१ शाळांमधील २० हजार २७३ मुले तर १७ हजार ५९५ मुली अशा एकूण ३७ हजार ८६८ परीक्षार्थींनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी २० हजार २२५ मुले व १७ हजार ५६१ मुली अशा एकूण ३७ हजार ७८६ परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधील ८७.९९ टक्के म्हणजे १७ हजार ७९६ मुले व ९२.१६ टक्के म्हणजे १६ हजार १८४ मुली असे एकूण ८९.९३ टक्के म्हणजे ३३ हजार ९८० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ३३ हजार ९८० उत्तीर्ण परीक्षार्थींपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ६ हजार ९०, प्रथम श्रेणीत ११ हजार ८५४, द्वितीय श्रेणीत १२ हजार २५५, उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ७८१ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात या वेळी ३ हजार २७८ पुनर्परीक्षार्थींनी (रिपिटर) परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार २५२ परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ४९.७५ टक्के म्हणजे १ हजार ६१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण परीक्षार्थींपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ५, प्रथम श्रेणीत १३०, द्वितीय श्रेणीत ५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत ९३० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावी परीक्षेचा तालुकानिहाय निकाल
अ.क्र. तालुकाशाळापरीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
०१पनवेल१०८१०,२१२९,३२७९१.३३
०२उरण२५२,२०४२,०२२९१.७४
०३कर्जत४१३,०७८२,६८३८७.१७
०४खालापूर३७२,७७८२,४०८८३.६८
०५सुधागड१८८७८७२६८२.६९
०६पेण४२२,५७७२,३४२९०.८८
०७अलिबाग४५३,२५६२,९०२८९.१३
०८मुरुड-जंजिरा१६१,०६०९४७८९.३४
०९रोहा४०२,३७२२,१७४९१.६५
१०माणगाव३९२,५२८२,३२४९१.९३
११तळा१२६५१५८०८९.०९
१२श्रीवर्धन२११,२६३१,११२८८.०४
१३म्हसळा२०१,०००८७४८७.४०
१४महाड४८३,०९९२,८३७९१.५५
१५.पोलादपूर१९८३०७२२८६.९
५३१३७,७८६३३,९८०८९.९३

Web Title: Girls beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.