शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:40 AM

Aditi Tatkare News : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धाटाव (रोहा) येथील सुदर्शन केमिकल्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 'नारीशक्ती सन्मान' पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

धाटाव : उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कोविड सेंटर, व्हेंटिलेंटर आदी गोष्टींत सुदर्शनसह इतर कंपन्यांची चांगली मदत झाली. त्यामुळे सुदर्शन कंपनीचा सेटअप इथून इतर कुठल्याही राज्यात जाण्याचा विचार त्यांच्या मनात येणार नाही, यासाठी उद्योग विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, असे अभिवचन आदिती तटकरे यांनी दिले.नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धाटाव (रोहा) येथील सुदर्शन केमिकल्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ह्यनारीशक्ती सन्मानह्ण पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या सोहळ्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक नितीन बंडगर, सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी, सीएसआर हेड शिवालिका पाटील, प्लांट हेड संजय शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करणाऱ्या पत्रकारांनाही कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले.पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट वुमेन टेक्निशिएशन ऑफ द ईअर' सन्मान प्रियांका पाटील, प्रगती कर्णेकर, उल्लेखनीय योगदानाबद्दल चंदा रटाटे, बेस्ट आयडिया सन्मान दीपिका दळवी, मंचिता ठाकूर, समीक्षा कडव, बेस्ट प्रेजेंटर दीप्ती गावंड, बेस्ट एक्सिक्युटर अंकिता पाटील, प्रगती जाधव, मंजुळा मोहिते या महिलांचा सन्मान करण्यात आला.आदिती तटकरे म्हणाल्या की, शहरी, ग्रामीण, दुर्गम अशा तीन भागांत रायगड विभागला आहे. त्यामुळे कंपन्यांना विस्तार करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी चांगले औद्योगिक धोरण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता हाच सामाजिक विकासाचा महत्त्वाचा धागा आहे. औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा अशी ओळख निर्माण व्हावी, असेही त्या म्हणाल्या.आवड जोपासून काम करायला हवेनिधी चौधरी म्हणाल्या की, ह्यप्लांटमध्ये मुली काम करताना पाहून मला आनंद झाला. कंपनीच्या आवारात केलेले पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, योग्य प्रकारे घेतलेली काळजी समाधानकारक आहे. शिक्षण, लग्न, जमेल ती नोकरी न करता, आपली आवड जोपासून काम करायला हवे. चांगली स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. या प्रवासात आपल्याला थांबवणाऱ्या अनेक व्यक्ती भेटतील, त्यांना दुर्लक्षित करून आपण आपले ध्येय पूर्ण करावे. महिला काम करतात, तेव्हा ते उत्तम दर्जाचे काम होते.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड