गीते रायगडचे मतदार नाहीत, मग बांधिलकी कुठून येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:26 AM2019-04-01T05:26:11+5:302019-04-01T05:26:32+5:30

सुनील तटकरे यांचा सवाल : दादर येथे म्हसळा तालुक्यातील मुंबईकरांचा मेळावा

Gite is not the voter of Raigad, then where will the commitment come from? | गीते रायगडचे मतदार नाहीत, मग बांधिलकी कुठून येणार?

गीते रायगडचे मतदार नाहीत, मग बांधिलकी कुठून येणार?

Next

मुंबई : आपल्या लोकसभा मतदार संघात मोबाइल कनेक्टिव्हिटी, पिण्याचे पाणी, मुंबई-गोवा महामार्ग, इतर रस्ते यांची कामे खासदार नाही तर कोण करणार? गीते हे मुळात रायगडचे मतदारच नसल्याने त्यांची तिथल्या मातीशी, लोकांशी बांधिलकी नाही. आपलेपणातून येथील लोकांसाठी काही करण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. रविवारी मुंबईत दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात म्हसळा तालुक्यातील मुंबईकरांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी अनंत गीते यांच्या निष्क्रि यतेवर त्यांनी टीका केली.

मला म्हसळा तालुक्यात कुठेही डोळ्यावर पट्टी बांधून उभे केले तरी कोणते गाव कुठल्या दिशेला आहे, हे मी सांगू शकेन. मात्र, गेली ३० वर्षे खासदार राहिलेल्या अनंत गीतेंना अजून रायगडचे रस्तेही माहीत नाहीत की गावांची नावेही माहीत नाहीत, असे ते म्हणाले. केवळ दोन लाख ९९ हजार रु पयांचे काम दाखवणारा कार्यअहवाल गीतेंनी छापला आहे. याहून जास्त काम तर आमचे पंचायत समितीचे सदस्यही करतात, असा टोला लगावताना तटकरे यांनी मीच गेल्या पाच वर्षांत कमीत कमी ३२ कोटींहून अधिक रु पयांची विकासकामे केल्याचा दावा केला. गीते यांचे काम दाखवा आणि दोन हजारांचे बक्षीस मिळवा, असे जाहीर करण्याची वेळ आली असल्याचा चिमटा काढला.

प्रचारसभेत खा. गीते आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून पैसे घेणार नाही, अशी शपथ घ्यायला लावतात. याची खिल्ली उडवत तटकरे यांनी तुमचा कार्यकर्त्यांवर भरोसा नाय का? असा प्रश्न विचारला. तुमच्या कार्यक र्त्यांच्या कष्टाची तुम्ही हीच किंमत करता का, असा सवाल त्यांनी गीते यांना केला. नवीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशावर टिपणी करताना तटकरे यांनी बॅ. ए. आर. अंतुले हे धर्मनिरपेक्ष विचारांचे अत्यंत ताकदीचे नेते होते, असे म्हणत वारसा हा रक्ताचा नसून विचारांचा असतो, असा टोला लागावला. आज देशाचे संविधान धोक्यात असताना आपल्याला सार्वभौमत्व व लोकशाही यांचे संरक्षण करण्यासाठी, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा सशक्त समाज घडवण्यासाठीच झटायला हवे, असे ते म्हणाले. आम्हाला कुणी जात, धर्म विचारला तर आम्ही भारतीय असेच सांगतो, कारण विकासाला जात नसते. २४ तास आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो, याचाच विचार डोक्यात असल्याचे ते म्हणाले.
मुंबई आणि रायगडचे मतदान एकाच दिवशी आले नसल्याने मुंबईत राहणाऱ्या रायगडकरांनी मोठ्या संख्येने गावी येऊन मतदान करावे, असे आवाहन तटकरे यांनी उपस्थितांना केले. या वेळी चिपखल ग्रामपंचायत हद्दीतील २५० ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

‘श्रीवर्धनचा पर्यटन विकास साधण्यात सुनील तटकरे यशस्वी’
च्मुंबई : श्रीवर्धनच्या सौंदर्यात भर टाकून येथे पर्यटनाचा विकास करून घरोघरी रोजगार निर्माण करण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले असल्याचा दावा आमदार अनिकेत तटकरे यांनी रविवारी बोलताना केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन तालुक्यातील मुंबईकरांचा मेळावा रविवारी मुंबईतील दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात घेण्यात आला. या वेळी आ. अनिकेत तटकरे बोलत होते.

च्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे उपस्थित होते. श्रीवर्धनच्या प्रत्येक गावाचा, वाडी वस्तीचा विकास तटकरेंनी कशा प्रकारे केला आहे, याचा उल्लेख आ.अनिकेत तटकरे यांनी केला. गीते ३० वर्षे खासदार असून त्यांनी रोजगार, शिक्षण, आरोग्य याबाबत तर काही केले नाहीच; पण ज्या समाजाचे नाव घेत ते जिंकत आले, त्या समाजासाठीही त्यांनी काही केले नाही.

च्आज येथील शिवसैनिकही सुनील तटकरे यांनाच मत देणार असल्याचे खासगीत सांगतात, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांनी सांगितले. एक मतही महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणीही हलगर्जी करू नये, अशी सूचना मुंबईत राहणाऱ्या श्रीवर्धनच्या मतदारांना केली.

Web Title: Gite is not the voter of Raigad, then where will the commitment come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.