अलिबाग : नैसिर्गक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे. त्यांना शेतकामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.सरकारने शेतकºयांना कर्जमुक्ती देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.आधार लिंक हा या योजनेचा मूळगाभा असल्यामुळे शेतकºयांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या कर्जखात्याशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकºयांना अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित, फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सरकार निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. संगणकीय सादरीकरणाद्वारेही योजनेची माहिती उपस्थितांना दाखविण्यात आली.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी आदी उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:15 AM