शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्म्यांची नावे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 3:47 AM

कर्जतकरांची मागणी : तालुक्यात सह्यांची मोहीम; खासदारांचा रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू

नेरळ : भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. या वीरांच्या नावातून कर्जतचा जाज्वल्य इतिहास जगाला कळावा व त्यांचे कायम स्मरण राहावे, यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल व नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील स्थानक नाव मिळावे, यासाठी कर्जत तालुक्यात गावागावात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहनांमधून अनाऊसमेंट करून आवाहन करण्यात येत आहे. यासंदर्भात अवसरे येथे रविवार एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक तरुण सदस्य उपस्थित होते.

सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगडावर येथे वीरगती प्राप्त झाली, ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे दिवाळीत एक दीप शहिदांचा या ग्रुपच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील तसेच क्र ांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेवून दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरु ण साजरा करत असतात. गतवर्षी तरुणांनी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल व नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव मिळावे ही संकल्पना मांडली.च्एक दीप शहिदांचा या ग्रुपने व क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने मावळचे खासदार श्रीरंग बारणे व भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना काही महिन्यांपूर्वी निवेदने देण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू केला आहे. कर्जत रेल्वे स्थानकाचे शहीद भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक व नेरळ रेल्वे स्थानकाचे शहीद हिराजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक असे नामकरण व्हावे अशी सर्व कर्जत तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे, यासाठी अवसरे येथे बैठकीचे आयोजन केले होते.

टॅग्स :Raigadरायगडrailwayरेल्वे