शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवदाम्पत्यांना द्या ‘युगल सुरक्षे’ची लग्न भेट; विमा पॉलिसी, रायगड डाक विभागाकडून आवाहन

By निखिल म्हात्रे | Published: May 01, 2024 7:24 PM

लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे.

अलिबाग : लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे. रायगड डाक विभागाकडून आपल्या एका कर्मचाऱ्याच्या लग्नात या पॉलिसीचे अनोखे अनावरण करीत त्याला या पॉलिसीची भेट देण्यात आली. लग्नात नवविवाहित दाम्पत्याला आप्तेष्ट वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. अनेकांना काय द्यावे, हा प्रश्न पडतो. यावर एक चांगला पर्याय डाक विभागाने उपलब्ध केला आहे. रायगड डाक विभागात कार्यरत मयूर भोईलकर (रा. आंबेपूर) याच्या लग्नात त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ही ‘युगल सुरक्षा’ नावाची विमा पॉलिसी काढून त्याचे विमापत्र लग्नात भेट दिले. सर्वसामान्यांना याबाबत माहिती व्हावी यासाठी रायगड डाक विभागाने ही अनोखी शक्कल लढवली. याप्रसंगी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर, सहायक अधीक्षक सुनील पवार, पोस्टमास्टर गजेंद्र भुसाणे, संतोष चिपळूणकर आदी उपस्थित होते.

काय आहे पॉलिसी?५ ते २० वर्षे मुदत असणारी ही विमा पॉलिसी लग्न केलेल्या व्यक्तीलाच काढता येते. लग्नाच्या दिवशी या पॉलिसीचा प्रीमियम भरून भेट देता येऊ शकते. एकच पॉलिसी, एकच विमा हप्ता असे त्याचे स्वरूप आहे. २० वर्षे मुदतीसाठी सामाहिक वय २१ असलेल्या जोडप्यासाठी १ लाख विम्यासाठी रु. ४२० व ४० वर्षे सामाहिक वय असलेल्या जोडप्यासाठी रु. ४७० दरमहा इतका कमी विमा हप्ता आहे. मुदतपूर्तीनंतर आताच्या व्याजदराप्रमाणे साधारण २ लाख ४ हजार रुपये मिळतात. विम्याच्या कालावधीत दोघांपैकी एकाचे काही झाले तर दुसऱ्याला बोनससहित विम्याची पूर्ण रक्कम मिळते. मुदतीमध्ये काही झाले नाही तरीही मुदतपूर्तीनंतर विम्याची पूर्ण रक्कम व बोनस विमाधारकास मिळतो.

टॅग्स :Raigadरायगडmarriageलग्न